close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

दरोरोज १० ते २० मिनिटांचा पॉवर नॅप आरोग्यास लाभदायक

माणसाला नेहमी ताजेतवाणे राहण्यासाठी आपल्या व्यस्त शेड्यूलमधून  १० ते २० मिनिटांचा पॉवर नॅप घेण्याची आवश्यकता असते. 

Updated: Apr 14, 2019, 08:47 AM IST
दरोरोज १० ते २० मिनिटांचा पॉवर नॅप आरोग्यास लाभदायक

मुंबई : आजच्या धकधकत्या जीवनात माणसाची झोप कायम अपूर्ण राहते. माणसाला नेहमी ताजेतवाणे राहण्यासाठी आपल्या व्यस्त शेड्यूलमधून  १० ते २० मिनिटांचा पॉवर नॅप घेण्याची आवश्यकता असते. अमेरिकन स्पेस एजेन्सी नासाच्या वतीने दरोरोज १० ते २० पॉवर नॅप घेण्याची गरज असल्याचे सांगण्यात आले आहे. जो व्यक्ती दिवसातून एकदातरी पॉवर नॅप घेतो, तो व्यक्ती नेहमी टवटवीत राहतो. नासाच्या संशोधकांनी लावलेल्या शोधानुसार दरोदोज १० ते २० मिनिटांचा पॉवर नॅव शारीरिक आणि बौद्धिक दृष्य्या लाभदायक असतो.

सध्या प्रत्येकाचे आयुष्य घडाळ्याच्या काट्यावर पूर्णपणे आधारलेले आहे. अशात ७ ते ८ तास काम करून व्यक्ती पूर्णत: झोपेच्या आवस्थेत जातो. त्यामुळे प्रत्येक जण चहा, कॉफी त्याचप्रमाणे हलकी झोप काढण्याच्या प्रयत्नात असतो. जर १० ते २० मिनिटांचा पॉवर नॅप घेतल्याने पुन्हा काम करण्याचा जोश कायम राहतो. 

ग्रेट इंडियन स्लीप स्कोरकार्डने दिलेल्या माहितीनुसार, १६ हजार नागरिककंसोबत याबाबत चर्चा करण्यात आली. तर या चर्चेमध्ये ७७ टक्के लोक २ ते ३ दिवस ऑफिस मध्ये कामाच्या तासात झोपेच्या स्थितीत असतात. ग्रेट इंडियन स्लीप स्कोरकार्डने दिल्लीमध्ये केलेल्या सर्वेक्षणात १७ हजार लोकांना झोपे विषयी प्रश्न विचारण्यात आले, त्यापैकी ८० टक्के लोकांचे झोप पूर्ण न होण्याचे कारण समोर आले आहे. सतत सोशल मीडिच्या वाढत्या वापरामुळे ही समस्या फार गंभीर होताना दिसत आहे. रात्री उशिरापर्यंत फेसबूक, व्हाट्सअॅप इत्यांदींच्या वापरामुळे ही बाब दिवसोंदिवस गंभीर होत आहे. 

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, रोज ७ ते ८ तासांची झोप आरोग्यासाठी लाभदायक असते. झोप पूर्ण न झाल्यास डोके दुखणे, उच्च रक्त दाब यांसारखे आजार उद्भवतात. अति झोपही आरोग्यास हानिकारक आहे. त्यामुळे ४५ वर्षांवरील नागरिकांमध्ये हृदयविकार, मधुमेह, नैराश्य, लठ्ठपणा याचा धोका असल्याचा समोर आले आहे.