मुंबई : कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉनने संपूर्ण जगाची चिंता वाढवली आहे. मात्र अशातच आता एत दिलासादायक बातमी समोर आली आहे. आता लहान मुलांचं लसीकरणासाठी लस उपलब्ध होणार आहे. DCGI ने लहान मुलांसाठी Covaxin लस मंजूर केली आहे. ही लस 12 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांना आपत्कालीन परिस्थितीत देण्यात येणार आहे.
सध्या ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळे संसर्गाचं प्रमाण वाढताना दिसतंय. देशात ओमायक्रॉनची वाढती प्रकरणं पाहता हा निर्णय घेण्यात आला आहे. DCGI ने 12 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांसाठी लसीच्या आपत्कालीन वापरासाठी परवानगी दिली आहे. भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सीनला ही परवानगी देण्यात आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी देशवासियांना संबोधित केलं. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 15 ते 18 वयोगटातील मुलांच्या लसीकरण मोहिमेला सुरवात होणार असल्याचंही सांगितलं. त्यानुसार देशात 3 जानेवारीपासून लहान मुलांना लस मिळणार आहे.
कोरोना योद्ध्यांसह 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना डॉक्टरांच्या सल्ल्याने प्रिकॉशनरी डोस देण्यात येणार आहे. गंभीर आजारांचा संसर्ग असलेल्या तसेच कोमॉर्बिड असलेल्या ज्येष्ठांना लस मिळणार आहे.