देशात बूस्टर डोसला परवानगी, मात्र नेमका कधी घ्यावा बूस्टर डोस?

पंतप्रधान मोदींनी ओमायक्रॉनमुळे कोरोना योद्ध्यांना बूस्टर डोस देण्यात येणार असल्याचं सांगितलं.

Updated: Dec 26, 2021, 08:02 AM IST
देशात बूस्टर डोसला परवानगी, मात्र नेमका कधी घ्यावा बूस्टर डोस? title=

दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी देशवासियांना कोरोनाचा नवा विषाणू ओमायक्रॉनच्या वाढत्या संसर्गाच्या मुद्द्यावरुन शनिवारी संबोधित केलं. यावेळी पंतप्रधान मोदींनी ओमायक्रॉनमुळे कोरोना योद्ध्यांना बूस्टर डोस देण्यात येणार असल्याचं सांगितलं. हे बूस्टर डोस 10 जानेवारीपासून सुरू करण्याचंही जाहीर केलंय. त्याचप्रमाणे 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींना आजार आहे ते देखील 10 जानेवारीपासून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार Precaution डोस घेऊ शकणार आहेत.

डॉक्टर रॅशेस एल्ला यांचं ट्विट

भारत बायोटेकचे क्लिनिकल लीड डॉ. रॅशेस एल्ला यांनी ट्विट केलं की, भारतात बूस्टर डोसची घोषणा करण्यात आली आहे. लसीच्या दुसर्‍या डोसनंतर, तिसरा डोस दीर्घ अंतराने अधिक प्रभावी ठरतो. कारण तो जास्त काळ प्लाझ्मा आणि मेमरी सेल तयार करते म्हणजेच रोगप्रतिकारशक्ती जास्त काळ टिकते.

बूस्टर डोस कधी घ्यावा?

डॉ रॅशेस एला म्हणाले की, दुसऱ्या डोसनंतर बूस्टर डोसचा 6 महिन्यांचं अंतर योग्य आहे. हे ओमिक्रॉनचा धोका कमी करण्यास देखील मदत करेल.

कधीपासून सुरु होणार मुलांचं वॅक्सिनेशन?

3 जानेवारीपासून लहान मुलांचं कोरोना लसीकरण सुरू होणार आहे. 15 ते 18 वयोगटातील मुलांना लसीचा डोस दिला जाईल. देशाला संबोधित करताना पीएम मोदींनी ही मोठी घोषणा केली. त्याचप्रमाणे देशात लवकरच नेझलद्वारे लस येणार आहे.