बिअर घेणाऱ्यांने सावधान! शरीरात ही लक्षणे दिसताच थांबा, नाहीतर...

Beer मुळे एचआयव्हीचा वाढतो धोका, वाचा सविस्तर

Updated: Aug 31, 2022, 02:57 PM IST
बिअर घेणाऱ्यांने सावधान! शरीरात ही लक्षणे दिसताच थांबा, नाहीतर... title=

Health News :  बऱ्याच जणांचा असा समज आहे की नियमित बिअर घेतल्याने तब्येत सुधारते. मात्र कित्येकजणांचं उलटं होतं, तब्येत काही सुधारत नाही परंतू ते लोक बिअर अॅडिक्ट होऊन जातात. बिअरच्या जास्त सेवनामुळेही तुम्हाला फार मोठं नुकसान होऊ शकतं. तुम्हाला जर ही  लक्षणे दिसू लागलीत तर बिअर पिणं बंद करा नाहीतर तुमच्या आरोग्याचं फार मोठं नुकसान होऊ शकतं. 

उच्च रक्तदाब - जर तुम्ही दररोज बिअरचे सेवन करत असाल आणि तुमचा ब्लड प्रेशर हाय राहत असेल आताच बिअर सोडा. हे तुमच्या आरोग्यासाठी फायद्याचं राहिलं. बिअरच्या जास्त सेवनामुळे हृदयविकार आणि स्ट्रोकचाही धोका वाढतो.

झोप न लागणं - दारूमध्ये असलेल्या काही घटकांमुळे तुम्हाला प्यायल्यावर झोप आल्यासारखं होतं. परंतु दारूने तुम्हाला गाढ झोप येत नाही. दारूमुळे वारंवार लघवी होते, ज्यामुळे आपण गाढ झोपू शकत नाही. झोपण्याअगोदर बिअर पेणं टाळा. 

तणाव- जर तुम्ही तणाव आणि चिंतेने त्रस्त असाल तर तुम्ही किती बिअर पितात याकडे लक्ष देणं आवश्यक आहे. बिअर पिल्याने शरीरातील कॉर्टिसोलची पातळी वाढते, ज्यामुळे तणाव आणि चिंता वाढण्याची शक्यता जास्त असते. 

जास्त आजारी पडणं- जर तुम्ही खूप आजारी पडत असाल तर तुम्ही यासाठी बिअर अति प्रमाणात सेवन करणं हे सुद्धा शकतं. जेव्हा तुम्ही जास्त दारू पिता तेव्हा तुमची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. त्यामुळे तुम्ही सारखे आजारी पडता. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या मते दारूचं जास्त सेवन केल्याने एचआयव्हीचा धोका वाढतो. कारण तुमची रोगप्रतिकारशक्ती कमी होते.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अवलंब करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला जरूर घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)