मुंबई : हिवाळ्याच्या दिवसात त्वचेची, आरोग्याची काळजी घेणं जितकं गरजेचे आहे. तितकेच तुम्ही केसांचे आरोग्य जपणंदेखील आवश्यक आहे.
कारण हिवाळ्याच्या दिवसात केस तुटण्याचा, गळण्याचा त्रास अधिक वाढतो.
तेल लावणं
हिवाळ्याच्या दिवसात केसांना जपण्यासाठी पुरेसे तेल लावणं गरजेचे आहे. टाळूपासून केसांच्या टोकांशी तेलाचा मसाज करा. तसेच तो पाण्याने स्वच्छ धुवा. म्हणजे केस हायड्रेट राहण्यास मदत होईल.
केसांना हायड्रेट ठेवण्यासाठी खोबरेल तेल, एरंडेल तेल, बदाम तेल फायदेशीर ठरते. या तेलांचे मिश्रण करून केसांना मसाज करा. रात्रभर तेल केसांना लावून ठेवा. याकरिता रात्रभर शॉवर कॅप घालूनही झोपू शकता.
डीप कंडिशनर
दोन आठवड्यातून एकदा केसांना डीप कंडिशनिंग हेअर पॅक लावा. रात्रभर पॅक लावून दुस्र्यादिवशी सकाळी केस स्वच्छ धुवावेत. यामुळे केसांचे आरोग्य जपायला मदत होते. तसेच केस अधिक उत्तमप्रकारे हायड्रेट होतात.
तुमच्याकडे फार नसल्यास किमान २० मिनिटं केसांना कंडिशनर लावा.
हायड्रेटिंग स्प्रे
3 भाग पाणी आणि एक भाग तेल एकत्र करा. या मिश्रणाने केसांचं पोषण होणयस मद्त होते. प्रामुख्याने बदामचं किंवा जोजोबा ऑईल वापरा. हे मिश्रण बाटलीमध्ये एकत्र करा. हे स्प्रे करून तुम्ही केस विंचरा. हा झटपट आणि फायदेशीर हेअर स्प्रे आहे.
कोरफडाचा गर
कोरफडीची पात कापा. त्यामधील गर बाहेर काढा. ताजा गर केसांना लावा. केस गरम टॉवेलमध्ये झाकून ठेवा. त्यानंतर जेलचा थर काढा. कोरफडीच्या गरामुळे केसांना मजबुती, चमक येण्यास मदत होईल.
केळ्याचा मास्क
केळ आरोग्याला जितकं फायदेशीर आहे. तितकाच त्याचा फायदा केसांसाठीही होतो. हिवाळ्याच्या दिवसात केसांना मॉईश्चर देण्यासाठी केळं फायदेशीर ठरतं. एक केळ स्मॅश करून त्यामध्ये मध मिसळा. तुमच्या केसांच्या लांबीनुसार केळ्याचा वापर अधिक प्रमाणात करू शकता.