Weight Loss Tips : हिवाळ्यात लठ्ठपणा कमी करायचाय? मग फॉलो करा या ट्रिक्स, झपाट्याने होईल वजन कमी

Weight Loss Tips at Home : हिवाळ्यात अनेकदा लोकांचे वजन वाढते. याची अनेक कारणे असू शकतात. दररोज व्यायाम न करणे, शारीरिक हालचालींचा अभाव यामुळे वजन वाढते. जर तुम्हाला वाढत्या वजनापासून सुटका हवी असेल तर खाली दिलेल्या ट्रिक्स फॉलो करा. 

श्वेता चव्हाण | Updated: Jan 9, 2024, 01:15 PM IST
Weight Loss Tips : हिवाळ्यात लठ्ठपणा कमी करायचाय? मग फॉलो करा या ट्रिक्स, झपाट्याने होईल वजन कमी title=

Diet Plan For Weight Loss In Marathi : सध्या हिवाळा हंगामा सुरु आहे. या दिवसाता अनेकांच्या तक्रारी असतात की, झोप पूर्ण होत नाही, सतत भूक लागते, वजन नियंत्रणात राहत  नाही. हिवाळ्या हा ऋतूच असा आहे की, ज्यामुळे लोकांचे वजन वाढते आणि भूक जास्त लागत असते. पण तुम्ही वजन कमी करण्यासाठी थोडे परिश्रम घेतले तर हिवाळा ऋतु वजन कमी करण्यासाठी अधिक चांगला मानला जातो. हिवाळ्यात तापमान कमी होत असताना, सकाळी उठणे आणि उबदार अंथरुण सोडणे हे एक कठीण काम वाटू शकते. रोज व्यायाम करता येत नाही, शारीरिक हालचालींचा अभाव यामुळे वजन वाढण्यास कारणीभूत ठरते. जर तुम्हाला वजन कमी करायचे असतील या टिप्स फॉलो करा. 

मीठ कमी खा

आहारात मीठ खाणे कमी करा. कारण वजन कमी करण्यासाठी आहारात सोडियमचे प्रमाण कमी असणे गरजेचे आहे.  जर  तुम्हाला अन्नाची चव वाढवायची असेल तर तुम्ही औषधी आणि मसाले वापरु शकता. कारण या गोष्टी शरीरातून अतिरिक्त पाणी काढून टाकण्यास मदत करते. 

चहा-कॉफी टाळा

अनेकजण चहा-कॉफीचे शौकीन असतात. विशेषत: हिवाळ्यात अनेकांना गरमा-गरम चहा किंवा कॉफी पियाला जास्त आवडतं. पण वजन वाढण्याचे एक प्रमुख कारण ठरु शकते. याचे जास्त सेवन केल्याने शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होते. त्यानंतर वजन कमी करणे कठीण होते. या पाण्याच्या कमतरतेचा तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो.

नियमित झोप घ्या

पुरेशा प्रमाणात झोपेमुळे तुमचे वजन नियंत्रित राहण्यास मदत होते. 7 ते 8 तासांची झोप चांगली मानली जाते. तुमची पचनक्रिया नियंत्रित ठेवण्यासोबतच ताण कमी होण्यासही मदत होते. असे केल्याने तुमचे वजन नियंत्रणात राहिल. 

हे सुद्धा वाचा : तुम्ही जास्त व्हेज खाता की नॉन व्हेज? 

मीठाईला बाय बाय करा

हिवाळ्यात वेगवेगळ्या प्रकारच्या मिठाई खाण्याची तल्लफ कोणाला नसते? गरमागरम गुलाबजाम आणि गाजराचा हलवा हा सर्वांनाच आवडतो. या ऋतूत गुळाचे पदार्थ चवीला रुचकर वाटतात, पण वजन वाढवण्यासाठी जास्त कारणीभूत ठरु शकतात. अशा परिस्थितीत तुम्ही या गोष्टी किती प्रमाणात खात आहात हे लक्षात ठेवा.

प्रक्रिया केलेले अन्न टाळा

तुमचे वजन वाढण्यास प्रोसेस्ड फूड देखील कारणीभूत आहे. यामध्ये साखर, फॅट आणि कॅलरीज जास्त असतात. ज्यामुळे शरीरातील कोलेस्ट्रॉल वाढते. याशिवाय हृदय आणि मधुमेहाच्या रुग्णांसाठीही हे अन्न हानिकारक आहे. म्हणून, ते ताबडतोब आपल्या आहारातून काढून टाकणे चांगले आहे. 

 

 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)