मुंबई : लॉकडाऊनमुळे सध्या अनेकांना वर्क फ्रॉम होमची सुविधा देण्यात आली आहे. अशात बहुतांश जणं ऑफिसमधल्या गोष्टी मिस करतयात. आता सकाळी उठलं की थेट लॅपटॉपसमोर बसून कामाला सुरुवात केली जातेय. पूर्ण दिवस बैठ काम असल्याने लोकांच्या वजनामध्ये वाढ होतेय. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला वर्क फ्रॉम होम असताना वजन वाढू नये यासाठी टीप्स देणार आहोत.
सकाळी उठल्यानंतर एक लीटर पाणी प्या. त्याचप्रमाणे कामाच्या दरम्यान तीन ते चार लीटर पाणी प्यायलं गेलं पाहिजे. यावेळी तुम्ही पाण्यात पुदीना तसंच लिंबू मिसळून डिटॉक्स ड्रिंक पिऊ शकता. यामुळे तुम्हाला पौष्टीक तत्त्व मिळण्यासही मदत होऊन फॅट बर्न होतात.
सध्या लॉकडाऊनमुळे जीम बंद असल्याने जीममध्ये जाऊन वर्कआऊट करणं शक्य नाही. त्याला पर्याय म्हणून तुम्ही पुशअप किंवा ऑनलाईन वर्कआऊट रूटीन फॉलो करू शकता. त्याचप्रमाणे इंचवार्म एक्सरसाइजचाही पर्याय तुमच्या समोर आहे. या एक्सरसाइजमुळे तुम्ही हेल्दी आणि फीट राहता.
अनेकदा घरून काम असल्याने आपल्याकडून दुपारचं जेवणं स्किप होतं. यानंतर आपण रात्री 7-8 वाजता रात्रीचं जेवण जेवतो. योग्य वेळी जेवल्याने पचनकार्य सुरळीत होण्यास मदत होते. निरोगी आरोग्यासाठी वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी पचनकार्य सुरळीत असणं गरजेचं आहे.
तुमच्या दररोजच्या आहारात 2-3 हिरव्या भाज्यांचा समावेश असला पाहिजे. सीजनल फ्रूट्स आणि भाज्यांमध्ये अँटी ऑक्सिडंची मात्रा भरपूर असते. तसंच फायबर असलेल्या पदार्थांमुळे वजन कमी होतं. अधिकतर भाज्यांमध्ये फायबर आणि पाण्याची मात्रा जास्त असल्याने कॅलरीज कमी असतात. त्यामुळे हिरव्या भाज्या खाल्ल्या पाहिजेत.
वर्क फ्रॉम होम असल्याने बहुतांश लोकं उशीरा झोपतात. यामुळे झोप पूर्ण होत नाही. याचा परिणाम थेट मेटाबॉलिझमवर पडतो. शिवाय झोप कमी झाल्याने भूकही जास्त लागते. परिणामी वजन वाढतं.