Weight Loss Tips: वजन कमी करण्यासाठी 'या' Diet plan वर नका ठेवू विश्वास

वाढत्या वजनामुळे त्रस्त आहात, तुम्ही चुकीचं Diet तर करत नाही? आताच थांबा, कारण...  

Updated: Sep 13, 2022, 10:13 AM IST
Weight Loss Tips: वजन कमी करण्यासाठी 'या' Diet plan वर नका ठेवू विश्वास title=

Weight Loss Tips: धकाधकीचं जीवन, तणाव, थकवा इत्यादी कारणांमुळे आपलं आरोग्याकडे दुर्लक्ष होतं. जेवणाची वेळ चुकल्यामुळे आपण अनेक आजारांना आमंत्रण देतो. महत्त्वाचं म्हणजे या सर्व कारणांमुळे वजन वाढतं. अनेक लोक वजन कमी करण्यास विविध गोष्टांचा वापर करतात, तर अनेक जण आहे ती परिस्थिती स्वीकारत पुढे जातात. त्यामुळे आज आम्‍ही तुम्‍हाला सांगणार आहोत की, वजन कमी करण्‍यासाठी कोणत्‍याही  Diet plan वर विश्वास ठेवू नका. ज्यामुळे तुम्हाला नंतर त्रास सहन करावा लागेल. 

कीटो Diet plan मुळे रक्त दाबाची समस्या वाढण्याची दाट शक्यता
वजन कमी करण्यासाठी कीटो डाएटचा ट्रेंड आजकाल वाढत आहे. या आहारात फॅटचे प्रमाण जास्त आणि काबर्सचं प्रमाण कमी असतं. त्यामुळे या आहाराचे सेवन करणाऱ्यांमध्ये रक्तदाब कमी होण्याची समस्या दिसून येत आहे. 

या आहाराच्या सततच्या वापराने हृदयविकाराचा झटका आणि बद्धकोष्ठतेचा धोकाही कायम असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे. ज्या लोकांना आधीच हृदय किंवा यकृताच्या समस्या आहेत, त्यांनी त्यांच्या डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच हा आहार पाळावा.

पॅलेओ Diet plan मध्ये प्रथिने घेण्यावर भर
पॅलेओ Diet plan मध्ये  प्रोटीवर जोर दिला जातो. शिवाय लोकांना अधिकाधिक फळे आणि भाज्या आणि मांसाहारी पदार्थ खाण्याचा सल्ला दिला जातो. त्यांना दूध आणि दुग्धजन्य पदार्थांपासून दूर राहा आणि त्यांचे सेवन करू नका, असेही सांगण्यात आलं.

या आहारातून शरीराला भरपूर प्रथिने मिळत असली तरी दूध आणि त्यापासून बनवलेल्या पदार्थांचे सेवन न केल्यास शरीरात कॅल्शियमची कमतरता भासू शकते, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. त्यामुळे हाडांमध्ये  कमजोरी येऊ शकते. अशा परिस्थितीत या आहाराचे फायदे कमी आणि तोटे जास्त असतात.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)