Weight loss : बेली फॅट कमी करताय? मग या चुका करणं टाळा

अनेकजण लठ्ठपणा कमी करण्यासाठी डाएट प्लॅन फॉलो करतात. 

Updated: Jun 5, 2021, 04:14 PM IST
Weight loss : बेली फॅट कमी करताय? मग या चुका करणं टाळा title=

मुंबई : आपल्यापैकी अनेकजण लठ्ठपणा कमी करण्यासाठी डाएट प्लॅन फॉलो करतात. खासकरून बेली फॅट कमी करण्यासाठी काहीजणं प्रचंड मेहनत घेतात. मात्र बेली फॅट कमी करण्याच्या दरम्यान काही छोट्या छोट्या चुका होतात. आणि याच चुकांमुळे बेली फॅट कमी होण्यापेक्षा ते वाढत जातं. जर तुम्हीही अशा प्रकारच्या चुका करत असाल तर त्या त्वरित बदला. जाणून घेऊया या चुका कोणत्या.

डाएट प्लॅनमध्ये पौष्टिक आहाराची कमी

बेली फॅट कमी करण्यासाठी कॅलरी कंट्रोल करणं फार महत्त्वाचं असतं. मात्र कॅलरी कंट्रोल करण्याच्या नादात आपण पौष्टीक आहारात देखील कमी करतो. यामुळे शरीरात स्नायू आणि पाण्याची कमतरता जाणवते. त्यामुळे बेली फॅट कमी होणं कठीण होतं.

पुरेसं पाणी न पिणं

वजन कमी करायचं असेल तर पाण्याची फार आवश्यकता भासते. त्याचप्रमाणे हे तुमच्या निरोगी आयुष्यासाठीही फायदेशीर ठरतं. शिवाय तुम्हाला दीर्घकाळ भूक देखील लागत नाही. जेवणापूर्वी पाणी पिणं फायदेशीर ठरतं. कारण पाणी प्यायल्याने जेवण्याची इच्छा कमी होते परिणामी कॅलरीजची मात्राही कमी होते. त्यामुळे पुरेश्या प्रमाणात पाणी न प्यायल्याने बेली फॅट कमी करणं मुश्किल होतं. 

ताण

एका अभ्यासानुसार असं समोर आलं आहे की, ताणतणावामुळे शरीरात कार्टिसोल हार्मोनची मात्रा वाढते. शरीरात या हार्मोनची मात्रा वाढली की, मेटाबॉलिझमची क्रिया कमी होते. मेटाबॉलिझम प्रक्रियेचा रेट कमी झाला की वजन घटवणं कठीण होतं. अशावेळी जरी तुम्ही वर्कआऊट जरी करत असाल तरीही तुमचं वजन वाढतं.

अपुरी झोप

अपुऱ्या झोपेमुळे वजन वाढतं. कमी प्रमाणात झोप घेतल्याने शरीरात कार्टिसोल हार्मोनची मात्रा वाढते. शिवाय तुम्हाला कॅलरीज असलेले पदार्थ खाण्याची इच्छा होते. त्यामुळे कमीत-कमी 7-8 तासांची झोप घेणं गरजेचं आहे.

फिजीकल अॅक्टिव्हीटी न करणं

जर तुम्ही दिवसभरात कोणत्याही प्रकारची एक्सरसाइज करत नसाल तर वजन कमी करणं मुश्किल होतं. त्यामुळे जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर एक्सरसाईज करणं फार गरजेचं आहे. एक्सरसाइडचा फायदा म्हणजे तुम्ही जलद गतीने कॅलरीज बर्न करू शकता. परिणामी बेली फॅट कमी होण्यास मदत होऊन शरीर फीट राहण्यास मदत मिळते.