मुंबई : कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव भारतात प्रचंड संख्येने वाढत आहे. रुग्णालयांमध्ये बेड आणि ऑक्सिजनची मोठी कमतरता आहे. त्यामुळे जास्त लक्षणं नसलेल्या रुग्णांनी रुग्णालयात भरती न होण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.
केंद्र सरकारने एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये टाटा मेमोरिअल रुग्णालयाचे डॉ. सीएस प्रमेश यांचा सल्ला सांगण्यात आला आहे. व्हिडिओत चांगल्या आहारासोबतच, योग-प्राणायम करणे, कोव्हिड-पॉझिटिव्ह रुग्णांनी ताप आणि ऑक्सिजन पातळी तपासत राहण्याचा सल्ला दिला आहे.
व्हिडिओ संदेशात म्हटले आहे की, तुमच्या शरीरातील ऑक्सिजन पातळी 94 पेक्षा जास्त असल्यास तुम्हाला भरती होण्याची गरज नाही. आणखी निट माहिती मिळवायची असल्यास, रुग्णाने आपल्या खोलीत 6 मिनिट चालावे त्यानंतर पुन्हा ऑक्सिजन चाचणी करावी. यानंतर तुमची ऑक्सिजन पातळी कमी जास्त होत असेल तर, तुम्ही रुग्णालयाशी संपर्क करावा.
व्हिडिओत म्हटले आहे की, जर रुग्णाची ऑक्सिजन पातळी ठीक आहे. तसेच तापाशिवाय अन्य कोणतेही लक्षण नाही. तर अशा परिस्थितीत पॅरासिटामॉल घेऊन घरी आराम करता येईल. अशा रुग्णांना रुग्णालयात दाखल होण्याची गरज नाही.
Watch this video to know when one should seek admission in a hospital when found COVID-19 positive. #IndiaFightsCorona @MoHFW_INDIA @PMOIndia @PIB_India @MIB_India @drharshvardhan @cspramesh
(2/2) pic.twitter.com/aodHAC34LA
— MyGovIndia (@mygovindia) April 21, 2021