White Hair Solutions: कमी वयात केस पांढरे झाले? 'हे' 4 घरगुती उपाय केल्यास होतील काळेभोर केस

White Hair Problem कमी वयात केस पांढरे होत असतील तर 'हे' घरगुती उपाय करा, नक्कीच होईल फायदा

Updated: Nov 24, 2022, 06:17 PM IST
White Hair Solutions: कमी वयात केस पांढरे झाले? 'हे' 4 घरगुती उपाय केल्यास होतील काळेभोर केस title=

Home Remedies for White Hair: 30 शीत असताना आपले केस हळूहळू पांढरे होऊ लागतात आणि ही एक सामान्य गोष्ट आहे. (White Hair Problem) मात्र, शाळेत असताना किंवा कॉलेजमध्ये असताना केस पांढरे होऊ लागले की अनेकांना लाज वाटू लागते.  (White Hair Problem Before 30s) त्यामुळे अनेकांचा आत्मविश्वासही कमी होतो. जर तुम्हालाही अशाच समस्येचा सामना करावा लागत असेल तर तुमच्या आहारात व्हिटॅमिन-सीयुक्त पदार्थांचा अवश्य समावेश करा. तसेच, अशा 4 घरगुती टिप्स वापरायला सुरुवात करा, ज्यामुळे तुमचे केस लवकर पांढरे होणार नाहीत.  (White Hair Problem in School or College) 

पांढरे केस काळे करण्याचे उपाय (Remedies for White Hair) 

आवळा (Amla) 

केस पांढरे होण्यापासून रोखण्यासाठी आवळ्या तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. आवळा आठवड्यातून एकदा बारीक करून त्याची पेस्ट केसांना लावा. यामुळे तुमच्या केसांना व्हिटॅमिन-सी मोठ्या प्रमाणात मिळेल आणि तुमचे केस आधीसारखे काळे राहतील.

भृंगराज तेल (Bhringraj Oil) 

ज्या लोकांचे केस वेळेपूर्वी पांढरे होत आहेत, ते भृंगराज तेल किंवा भृंगराज पावडर देखील वापरू शकतात. केसांना भृंगराज लावल्यानंतर अर्ध्या तासानंतर केस नॅच्युरल शॅम्पुनं धुवा. पांढऱ्या केसांवर हा चांगला उपाय आहे. (White Hair Solutions) 

हेही वाचा : Postpone Periods Naturally: औषधांशिवाय मासिक पाळी पुढे ढकलायचीये? करा हे घरगुती उपाय

कांद्याचा रस (Onion)

कांदा अनेक औषधी गुणांनी समृद्ध मानला जातो. केस पांढरे होण्याच्या समस्येला तोंड देण्यासाठी कांद्याचा रस काढून डोक्यावर लावा आणि हलक्या हातांनं मसाज करा. असं केल्यानं कांद्याचा रस तुमच्या केसांच्या मुळांमध्ये जाईल, ज्यामुळे तुमचे केस पूर्वीसारखेच नैसर्गिकरित्या काळे होऊ लागतील.

कढीपत्ता (Curry Leaves) 
कढीपत्ता जेवण बनवताना वापरतात. त्यासोबत कढीपत्ता हा केसांसाठी सगळ्यात चांगला आहे. कढीपत्त्यामुळे केस पूर्वीसारखे काळे होऊ शकतात. कढीपत्ता मेंहंदी प्रमाणे बारीक करा. यानंतर त्यात थोडं पाणी मिसळून एक पेस्ट तयार करा आणि नंतर केसांना लावा. आठवड्यातून एकदा हा उपाय करून पाहिल्यास तुमचे केस पूर्वीसारखे काळे होऊ लागतात.

(Disclaimer: वरील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. दैनंदिन आयुष्यात याचा वापर करायचा झाल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)