दिल्ली : देशात कोरोना लसीकरण मोहीम सुरू होऊन आठ महिन्यांहून अधिक काळ उलटला आहे. लाखो लोकांचं यामध्ये लसीकरण करण्यात आलं आहे, परंतु भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन ही लस अद्याप जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. यासाठी भारत बायोटेकने अनेक महिन्यांपूर्वीच अर्ज केला आहे आणि आवश्यक कागदपत्रेही सादर केली आहेत.
दरम्यान पुढील महिन्यात कोव्हॅक्सिनला चांगली बातमी मिळू शकते. भारत बायोटेकच्या कोवासीनला WHO कडून मान्यता मिळणं अपेक्षित आहे.
मुख्य म्हणजे, ऑक्टोबरमध्ये, तज्ज्ञांच्या सल्लागार समितीची (SAGE) बैठक डब्ल्यूएचओच्या आणीबाणी वापरासाठी मंजुरीच्या संदर्भात आयोजित केली जाणार आहे. ही बैठक 5 ऑक्टोबर रोजी निश्चित करण्यात आली आहे. या बैठकीत कोव्हॅक्सिनला जागतिक आरोग्य संघटनेकडून ग्रीन सिग्नल मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या बैठकीत, लसीच्या 1,2,3 क्लिनिकल डेटावर चर्चा केली जाईल आणि सुरक्षा, कार्यक्षमता आणि परिणामकारकता यावर चर्चा केली जाईल.
भारत बायोटेकने शुक्रवारी सांगितलं की, त्यांनी आपल्या कोविड -19 लस लसीशी संबंधित सर्व आकडेवारी जागतिक आरोग्य संघटनेला सादर केली आहे. यानंतर आता त्यांच्या प्रतिसादाची वाट पाहत आहे. WHO सध्या लस उत्पादकाने सादर केलेला डेटा रिव्ह्यू करत आहे.
भारत बायोटेकने ट्वीट केलं, "कोव्हॅक्सिनच्या क्लिनिकल ट्रायलमधील डेटा पूर्णपणे कंपाईल करून जून महिन्यातच उपलब्ध करून देण्यात आला. आपात्कालीन वापराच्या यादीत अर्ज करण्यासाठी जुलैच्या सुरुवातीला WHO ला सर्व डेटा पाठवण्यात आला. आम्ही संस्थेने मागितलेल्या स्पष्टीकरणांना प्रतिसादही दिला आहे आणि पुढील प्रतिसादाच्या प्रतीक्षेत आहोत.