हळद आणि काळामिरीचं मिश्रण या '3' समस्यांवर फायदेशीर उपचार

  अगदी सर्दी खोकल्यापासून कॅन्सरचा धोका कमी करण्याची क्षमता आपल्या स्वयंपाकघरातील काही मसाल्यांमध्ये आहे.

Updated: Mar 15, 2018, 09:36 PM IST
हळद आणि काळामिरीचं मिश्रण या '3' समस्यांवर फायदेशीर उपचार  title=

मुंबई :  अगदी सर्दी खोकल्यापासून कॅन्सरचा धोका कमी करण्याची क्षमता आपल्या स्वयंपाकघरातील काही मसाल्यांमध्ये आहे.

प्रामुख्याने हळद आणि काळामिरी अनेक समस्या कमी करण्यास मदत करतात.

आरोग्यदायी घटक  

हळदीमध्ये अ‍ॅन्टीमायाक्रोबियल, दाहशामक गुणधर्म आहेत. तर काळामिरी कॅन्सरचा धोका कमी करण्यास, वजन घटवण्यास, पोटफुगी, गॅसचा त्रास कमी करण्यास, त्वचेचा तजेला सुधारण्यास मदत करतात. म्हणूनच आहारापासून ते अगदी औषधांपर्यंत हळद आणि काळामिरीचा वापर अगदी हमखास केला जातो.

हळदीमधील क्युरक्युमिन घटकाचा प्रभाव अधिक गुणकारी होण्यासाठी त्याच्या सोबतीला काळामिरी असणं गरजेचे आहे. हळदीमधील क्युरक्युमिन घटकामध्ये अनेक औषधी घटक असतात. तसेच काळामिरीतील piperine घटक काळामिरीला तिखटपाणा आणि औषधी गुणधर्म देतात. म्हणूनच जेव्हा उत्तम वैद्यकीय गुण यावा यासाठी प्रयत्न केले जातात तेव्हा curcumin आणि piperine हे  एकत्र असणं अधिक गरजेचे आहे.  

काळामिरी हळदीमध्ये मिसळणं कसं ठरतं फायदेशीर ?

हळदीतील  curcumin  घटक आणि काळामिरीतील piperine घटक अधिक प्रभावशाली असतात. शरीरात curcumin चा औषधी गुणधर्म पूर्णपणे शोषला जाण्यास आणि त्याचा औषधी प्रभाव अधिकाधिक दिसण्यास  piperine घटक मदत करतात.यामुळे मेटॅबॉलिझमचा रेट सुधारतो.

हळद आणि काळामिरी चे मिश्रण कोणत्या समस्यांवर ठरते परिणामकारक

नर्व्ह सिस्टीमवर होणारा घातक परिणाम कमी करतो –
हळदीतील polyphenol curcumin घटक शरीरातील ऑक्सिडेटीव्ह स्ट्रेस कमी करण्यास मदत करतात. केवळ हळदीच्या सेवनाने हा परिणाम दिसत नाही. हा परिणाम तपासण्यासाठी शास्त्रज्ञांनी काही उंदरांवर प्रयोग केला. जेव्हा हळदीसोबत काळामिरीचा वापर करून औषधं दिली तेव्हा नर्व्ह्स सिस्टीमवरील विषारी घटकांचा परिणाम कमी झाल्याचे निष्कर्षात आढळून आले. .

2. पित्ताशयाचे खडे बनण्याची शक्यता कमी करतात .

आहारात हळदीचा समावेश केल्यास पित्ताशयाचे खडे निर्माण होण्याची शक्यता कमी होते. पण हळदीला अधिक प्रभावशाली बनवण्यासाठी हळदीसोबत काळामिरीचेही सेवन केल्यास पित्ताशयाच्या खड्यांची त्रासदायक समस्या आटोक्यात राहण्यास मदत होते.

3. ऑस्टोपोरायसिसचा त्रास आटोक्यात राहतो –

Osteoclasts हे बोन सेल्स हाडांतील टिश्यूंचे नुकसान करतात. परिणामी ऑस्टोपोरायसिसचा त्रास वाढवतात. Journal of Endodontics च्या अहवालानुसार, हळद आणि काळामिरी एकत्र करून सेवन केल्यास Osteoclastsच्या निर्मितीवर नियंत्रण ठेवता येते. परिणामी हाडांचे आरोग्य जपण्यास मदत होते.