सुपरफुड आहे तुमच्या गावातल्या शेतात पिकणारं हे धान्य, गंभीर आजारांवरही करेल मात

Jowar Benefits In Marathi: ज्वारीची भाकरी, ज्वारीचे धिरडे असे अनेक पदार्थ हल्ली लोकप्रिय झाले आहेत. ज्वारी खाण्याचे अनेक फायदे आहेत, जाणून घ्या

मानसी क्षीरसागर | Updated: Feb 6, 2024, 07:20 PM IST
सुपरफुड आहे तुमच्या गावातल्या शेतात पिकणारं हे धान्य, गंभीर आजारांवरही करेल मात  title=
why jowar sorghum is good for your health know health benefits

Jowar Benefits In Marathi: 2018 साली भारतात ईयर ऑफ मिलेट्स साजरा करण्यात आला. संयुक्त राष्ट्रानेही 2023साली आंतरराष्ट्रीय ईयर ऑफ मिलेट्स साजरा करण्याची घोषणा केली. मिलेट्स म्हणजे भरड धान्य यात बाजरी, ज्वारी, रागी यासारखे धान्य सामील आहेत. हे धान्य आपल्या आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहे. पण या सर्व धान्यांतूनही ज्वारीचे फायदे अगणित आहेत. या धान्याला भारताचे सुपरफुड असंही म्हटलं जाते. ज्वारीचे औषधी गुणधर्म काय आहेत हे जाणून घेऊया आणि शरीरासाठी का आवश्यक आहेत, हेदेखील जाणून घेऊया. 

ज्वारीमध्ये असे अनेक पोषक तत्वे आणि गुणधर्म आहेत जे शरीरासाठी आवश्यक आहेत. जर तुमच्या शरीरातील कॉलेस्ट्रॉल कमी होत नसेल किंवा जिममध्ये तासनतास घाम गाळून वजन कमी करण्याचा प्रयत्न करताय तर ज्वारी तुमच्यासाठी रामबाण आहे. ज्वारीचे खास वैशिष्ट्ये म्हणजे ते ग्लूटन फ्री आहे. म्हणजेच ज्यांना ग्लूटन नावाच्या प्रोटिनची अॅलर्जी आहे त्यांच्यासाठी ज्वारीचा पर्याय सर्वोत्तम आहे. 

पोटाच्या समस्या दूर होतील. 

ज्वारीत फायबरचे प्रमाण अधिक असते. ज्यामुळं पचनसंस्था सुधारण्यास मदत होते. तसंच, पोटाच्या इतर समस्याही उद्भवत नाहीत. गव्हाच्या चपात्या खाण्याचा कंटाळा असेल तर ज्वारीच्या भाकऱ्यांचा पर्याय उत्तम आहे. 

सिलीएक रोगावर रामबाण

ज्वारीचे धान्य ग्लुटेन फ्री असते. त्यामुळं जे लोक सीलिएक रोगाने ग्रस्त असतात किंवा ग्लुटेन पचवू शकत नाहीत त्यांच्यासाठी ज्वारी हे सुरक्षित आणि पौष्टिक धान्य आहे. 

वजन नियंत्रणात राहते

ज्वारीचे सेवन केल्यास वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. कारण यात फायबरचे प्रमाण अधिक असते. ज्यामुळं भुख नियंत्रणात राहते आणि पाचनसंस्था सुधारते. 

मिनरल्स-प्रोटीनने युक्त

ज्वारीत मिनरल्स, प्रोटीन आणि व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्सचे प्रमाण अधिक असते. यात पोटेशियम, फोस्फोरस, कॅल्शियम आणि आयर्नची मात्रा अधिक आढळते. ज्यामुळं पोषक तत्वात वाढ होते. 

शुगल लेव्हल नियंत्रणात ठेवण्यास 

ज्वारीची भाकरी खाल्ल्याने शुगर लेव्हल नियंत्रित ठेवण्यास मदत होते. त्याचबरोबर, इन्सुलिन आणि ग्लुकोज लेव्हलदेखील योग्य मात्रेत राहते. ज्याचा फायदा मधुमेहाच्या रुग्णांना होतो. ज्वारी स्टार्चदेखील कमी करते. 

दृदय निरोगी राखते

ब्लड शुगर झपाट्याने कमी करण्यास ज्वारी मदत करते. त्याचबरोबर हृदयाचे आरोग्यही निरोगी राखते. त्याचबरोबर, ज्वारी, किडनी, अर्थरायटिससारखे आजारांवरही रामबाण आहे. 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)