Winter Body Care Tips : अंघोळ करताना पाण्यात मिसळा ‘हे’ तेल; मिळवा कधीही पाहिली नसेल अशी चमकदार त्वचा

हिवाळा (Winter) हा ऋतू अनेकांच्या आवडीच्या. घामाचे ओघळ नाहीत, पावसाची रिपरिप नाही फक्त सुरेख वातावरण आणि हवेतला अल्हाददायक गारवा इतकंच काय ते. पण, हाच हिवाळा आवडत नाही, असे म्हणणारेही काहीजण आहेत. बरं, यातही त्यांना हिवाळा न आवडण्याचं कारण म्हणजे सतत रुक्ष होणारी, काळवंडणारी त्वचा. 

Updated: Oct 25, 2022, 07:17 AM IST
Winter Body Care Tips : अंघोळ करताना पाण्यात मिसळा ‘हे’ तेल; मिळवा कधीही पाहिली नसेल अशी चमकदार त्वचा title=
skin Care Tips

skin Care Tips : हिवाळा (Winter) हा ऋतू अनेकांच्या आवडीच्या. घामाचे ओघळ नाहीत, पावसाची रिपरिप नाही फक्त सुरेख वातावरण आणि हवेतला अल्हाददायक गारवा इतकंच काय ते. पण, हाच हिवाळा आवडत नाही, असे म्हणणारेही काहीजण आहेत. बरं, यातही त्यांना हिवाळा न आवडण्याचं कारण म्हणजे सतत रुक्ष होणारी, काळवंडणारी त्वचा. मुळात या दिवसांमध्ये त्वचेची काळजी (Skin care) न घेतल्यामुळं हे परिणाम दिसून येतात. तेव्हा तुम्हालाही आता थंडीच्या दिवसांमध्ये चमकदार आणि नितळ त्वचा हवी असल्यास एक लहानशी सवय अंगी बाणवून पाहाच. (Winter Body skin Care Tips at home)

एक तेल करेल कमाल...

हिवाळ्याच्या दिवसांमध्ये अंघोळ करतेवेळी त्या पाण्यात अवघे दोन थेंब ऑलिव्ह ऑईल (olive oil ) मिसळा. हे तेल पाण्यात व्यवस्थित मिसळा आणि त्यानं अंघोळ करा. पाण्यात तेल टाकल्यामुळे ते शरीरातील, त्वचेतील आर्द्रता (Moisture) कायम ठेवण्याचं काम करतं. यामुळं त्वचा चमकदार आणि मुलायम होते.

अधिक वाचा : Health Tips: जाणून घ्या... पचन आणि वजन यांचा काय संबंध? वजन कमी होण्याची शक्यता...

ऑलिव्ह ऑईलमध्ये व्हिटामिन ईचं (Vitamin E) प्रमाण मोठ्या प्रमाणआत असतं. ज्यामुळं ते पाण्यात मिसळल्यानंतर शरीरावर व्यवस्थित पसरतं आणि त्याचे परिणआम दिसून येतात. यामध्ये असणारं व्हिटामिन पॉलिफेनॉल आणि सायटोस्टेरॉलपासून कोशिकांना नष्ट होण्यापासून वाचवतात. यामध्ये असणारे अँटीऑक्सिडेंट घटक त्वचेतील चमक बाहेर काढण्यास मदत करतात.

तारुण्य कायम टिकवून ठेवतं हे तेल...

अंघोळीच्या पाण्यात olive oil मिसळल्यास आणि ही सवय कायम ठेवल्यास त्वचेतून आर्द्रता शरीरात पुन्हा प्रवेश करते ज्यामुळं वाढत्या वयानं होणारे परिणाम कमी प्रमाणात दिसू लागतात. चेहऱ्यावरील सुरकुत्यांवरही याचे परिणाम दिसून येतात, त्यांच प्रमाण कमी होतं. ज्यामुळं तुमच्या वयाचा अंदाज लावणं कठीण होऊन बसतं.

(वरील माहिती सर्वसामान्य संदर्भांआधारे घेण्यात आली आहे. Allergy चा त्रास असल्यास हा उपाय करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या.)