मुंबई : लहान बाळाच्या उत्तम आरोग्यासाठी आईचं दूध हे फार महत्त्वाचं मानलं जातं. जन्मानंतर बाळाच्या पोषण मिळावं आणि गंभीर आजारांपासून दूर राहण्यासाठी अँटीबॉडीज तयार होण्यासाठी आईच्या दूधाची गरज असते. जन्मानंतर आईचं दूध हे पोषक घटकांसाठी बाळाला एकमेव आधार असतो. जागतिक आरोग्य संघटनेनुसार आणि तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, बाळंतपणानंतर पहिले 6 महिने बाळाला स्तनपान दिलं पाहिजं.
स्तनपानाविषयी जनजागृती व्हावी यासाठी प्रत्येक वर्षी 1 ते 7 ऑगस्ट जागतिक स्तनपान आठवडा मानला जातो. तर आज या आठवड्याच्या निमित्ताने जाणून घेऊया ब्रेस्टफिडींग संदर्भात काही गैरसमजुती आणि त्यामागील सत्यता जाणून घेऊया.
यूनाइटेड नेशन चिल्ड्रेंस फंड म्हणजेच युनिसेफच्या म्हणण्याप्रमाणे, स्तनपान सुरु केल्यानंतर काही दिवस अस्वस्थ जाणवणं सामान्य गोष्ट आहे. दरम्यान यावेळी निप्पलमध्ये वेदना होणं सामान्य आहे. मात्र स्तनपान देताना वेदना होत नाहीत.
युनिसेफच्या अनुसार, काही महिलांना भरपूर दूध येतं. मात्र जर तुम्हाला वाटत असेल की, तुमच्या ब्रेस्टमध्ये पुरेशा प्रमाणात दूध तयार होत नसेल तर त्यामागे काही कारण असू शकतात.
अनेक मातांच्या मनात प्रश्न असतो की, आजारी असल्यावर बाळाला दूध पाजू शकतो का नाही. मात्र तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने आणि योग्य उपचाराने स्तनपान चालू ठेवू शकता.
तज्ज्ञांचे म्हणणं आहे की, आजारी असताना महिलेच्या शरीरात तयार होणाऱ्या अँटीबॉडीज आईच्या दुधातून बाळापर्यंत पोहोचतात. यामुळे, मुलामध्ये देखील रोगाविरूद्ध प्रतिकारशक्ती वाढते. जर रोग संसर्गजन्य असेल तर आपण बाळाला ब्रेस्ट पंप लावून दूध पाजू शकता.