Best Food For Heart : हृदयाचे आरोग्य उत्तम राखणे अत्यंत आवश्यक आहे. आपल्या शरीरातील सर्वात महत्त्वाचा अवयव म्हणजे हृदय, जे निरोगी राहण्यासाठी नेहमीच महत्त्वाचे असते. हृदयाच्या आरोग्याविषयी लोकांना जागरुक करण्यासाठी दरवर्षी 29 सप्टेंबर रोजी 'जागतिक हृदय दिन' साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्याचा उद्देश सामान्य लोकांमध्ये हृदयाच्या आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करणे हा आहे.
जागतिक हृदय दिन दरवर्षी एका खास थीमसह साजरा केला जातो. वर्ष 2024 ची थीम "Use Heart For Action" आहे. याचा अर्थ असा आहे की, काहीही करण्यापूर्वी आपण आपल्या हृदयाचे ऐकले पाहिजे. भावना समजून घेऊन त्यांचे कृतीत रूपांतर केले पाहिजे. हृदय निरोगी ठेवण्यासाठी आपल्या खाण्याच्या सवयी खूप महत्त्वाच्या आहेत. चांगल्या खाण्याच्या सवयी आणि योग्य जीवनशैली हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत करते. चला जाणून घेऊया अशाच 5 पदार्थांबद्दल जे हृदय निरोगी ठेवण्यास मदत करतात.
ओमेगा -3 फॅटी ऍसिड समृद्ध मासे, सॅल्मन, मॅकरेल आणि सार्डिन सारख्या माशांमध्ये ओमेगा -3 फॅटी ऍसिड भरपूर असतात. या फॅटी ऍसिडमुळे हृदयविकाराचा धोका कमी होण्यास मदत होते.
अक्रोड - अक्रोडमध्ये ओमेगा-३ फॅटी ॲसिड तसेच हृदय निरोगी ठेवण्यास मदत करणारे इतर पोषक घटक असतात.
फळे आणि भाज्या - फळे आणि भाज्यांमध्ये भरपूर जीवनसत्त्वे, खनिजे आणि फायबर असतात. हे पोषक तत्व हृदय निरोगी ठेवण्यास मदत करतात. यामुळे फळे आणि भाज्या रक्तदाब कमी करतात, कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित करतात आणि हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका कमी करतात.
डाळी - कडधान्ये ही प्रथिने, फायबर आणि इतर पोषक तत्वांचा चांगला स्रोत आहे. हे हृदय निरोगी ठेवण्यास मदत करतात. कडधान्ये कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करतात आणि रक्तातील साखर नियंत्रित करण्यास मदत करतात.
ओट्स - ओट्समध्ये विरघळणारे फायबर असते जे कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत करते. ओट्स हृदयविकाराचा धोका कमी करण्यास मदत करतात.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)