सतत जांभई येते, तात्काळ घ्या डॉक्टरांचा सल्ला

धावपळीचे दिवस, बदलती जीवनशैली, सतत वाढणारा तणाव, थकवा इत्यादी कारणांमुळे जांभई येते.

Updated: Jun 17, 2019, 01:35 PM IST
सतत जांभई येते, तात्काळ घ्या डॉक्टरांचा सल्ला title=

मुंबई : धावपळीचे दिवस, बदलती जीवनशैली, सतत वाढणारा तणाव, थकवा इत्यादी कारणांमुळे जांभई येते. व्यस्त वेळापत्रकामुळे शरीराला आराम मिळत नाही, त्यामुळे जांभई येते. पण सतत जांभई येणे आरोग्यास घातक सुद्धा ठरू शकते. शिवाय काही लोकांमध्ये पुरेशी झोप घेतल्यानंतरही वारंवार जांभई देण्याची सवय असते. जांभई केवळ कंटाळा आल्याचे संकेत देत नाहीत, तर यामागे काही आरोग्याशी निगडीत समस्यांचा धोकाही असतो. शरीरात वाढणार्‍या काही आजारांच्या धोक्याचे संकेत 'जांभई'च्या माध्यमातून मिळू शकतात.   

- यकृताच्या (लिव्हर) समस्या असणाऱ्या व्यक्तींना सतत थकवा जाणवतो. थकव्यामुळे जांभई येण्याचे प्रमाण वाढते. त्यामुळे संबंधित त्रासाबद्दल वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

- तज्ञांच्या सल्ल्यानुसार, हृद्य आणि फुफ्फुसाच्या आजारामध्येही जांभई येण्याचे प्रमाण अधिक असते. हृद्य आणि फुफ्फुसाचे काम नीट होत नसल्यास अस्थमाचा त्रास वाढू शकतो. 

- एका संशोधनानुसार, वारंवार जांभई येणं हे ब्रेन ट्युमरचेही संकेत देतात. त्याचप्रमाणे ह्रदय विकाराचा झटका येणे, एपिलेप्सी, शरीरातील तापमान नियंत्रित नसणे, इत्यादी समस्या जांभईमुळे डोकंवर काढतात. त्यामुळे वेळेतच डॉक्टरांचा सल्ला घ्या. 

- ताणतणावामुळे रक्तदाबाचा त्रासही वाढतो. हृद्याची धडधड मंदावते. अशावेळेस मेंदूपर्यंत ऑक्सिजनचा योग्य प्रमाणात पुरवठा होत नाही.