आता '१००' ऐवजी '११२' हेल्पलाईन नंबर होणार लागू

आपत्कालीन '११२' हेल्पलाइन नंबर देशाच्या विविध भागांमध्ये लागू करण्यात येणार आहे.

Updated: Oct 21, 2019, 10:54 AM IST
आता '१००' ऐवजी '११२' हेल्पलाईन नंबर होणार लागू title=

नवी दिल्ली : दिल्लीनंतर आता उत्तर प्रदेशमध्ये देखील '११२' हा हेल्पलाईन नंबर लागू करण्यात येणार आहे. उत्तर प्रदेशात आता १०० नाही तर ११२ नंबर डायल केल्यानंतर पोलीस किंवा दुसऱ्या आपत्कालीन सेवेचा लाभ घेता येणार आहे. २६ ऑक्टोबरपासून '११२' हा हेल्पलाईन नंबर लागू करण्यात येणार आहे. '११२' हेल्पलाईन नंबर कार्यान्वीत झाल्यानंतर '१००' हेल्पलाईन नंबरची सेवा बंद करण्यात येणार आहे. 

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ २६ ऑक्टोबर रोजी '११२' हा हेल्पलाइन नंबर लागू करणार आहे. अनेक देशांच्या धर्तीवर आपत्कालीन '११२' हेल्पलाइन नंबर उत्तर प्रदेशात देखील लागू करण्यात येणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी २० सप्टेंबर रोजी देशातील आणीबाणी प्रतिसाद समर्थन प्रणाली (ERSS) सुरू केली होती. 

दिल्ली मध्ये २५ सप्टेंबर पासून ११२ हेल्पलाइन नंबर लागू करण्यात आला आहे. त्याप्रमाणे चंदीगडमध्ये सर्वात पहिली आपत्कालीन सेवा सुरू केली होती. रूग्णवाहिका, अग्नीशमन आणि पोलीस यांचे वेगवेगळे नंबर लक्षात ठेवण्या ऐवजी फक्त आता '११२' हेल्पलाइन नंबरद्वारे मदत मिळू शकते.

आपत्कालीन '११२' हेल्पलाइन नंबर देशाच्या विविध भागांमध्ये लागू करण्यात येणार आहे. काही दिवसांपूर्वी दिल्लीत हा नंबर लागू करण्यात आल्यानंतर आता काहीदिवसांतच देशभरात '११२' हेल्पलाइन नंबर लागू करण्यात येणार आहे.