10,000 हिमनद्या वितळल्या... तिसऱ्या ध्रुवातून भारतासह चीन, नेपाळ आणि पाकला धोका

हिमालयातील 10,000 हिमनद्या वितळल्या आहेत. यामुळे भारतासह चीन, नेपाळ आणि पाकिस्तानाला धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. 

वनिता कांबळे | Updated: Dec 18, 2023, 05:51 PM IST
10,000 हिमनद्या वितळल्या... तिसऱ्या ध्रुवातून भारतासह चीन, नेपाळ आणि पाकला धोका  title=

Third Pole Meltdown: ग्लोबल वार्मिंगचा फटका संपूर्ण जगाला बसत आहे. अंटार्क्टिकामध्ये (Antarctica) जगातील सर्वात मोठा हिमखंड तुटल्याने जगभरातील संशोधक चिंतेत आहेत.  तुटलेला हिमखंड दक्षिण महासागराच्या दिशेने सरकत आहे. हा हिमखंड अंटार्क्टिकामधील अनेक  जीवांसाठी धोकादायक ठरु शकतो अशी भिती व्यक्त केली जात आहे. त्यातच आता जगाचा तिसरा ध्रुव (Third Pole ) अशी ओळख असलेल्या हिमालयातील   (Himalaya) तब्बल 10,000 हिमनद्या वितळू लागल्या आहेत. हा तिसरा ध्रुव भारतासह चीन, नेपाळ आणि पाकिस्तानसाठी धोकादायक ठरणार आहे. 

मोठा विध्वंस होण्याची भिती

हिमालयात तिबेटी पठार, हिंदुकुश आणि तियानशान पर्वतरांगांचा समावेश होतो. हवामानातील बदल  (Climate Change), वाढते तापमान (Rising Temperature) आणि पावसाच्या बदलत्या पद्धतीचा थेट परिणाम तिसरा ध्रुव अर्थात हिमालयावर होत आहे.  मागील 30 वर्षांत हिमालयातील 10 हजार हिमनद्या वितळल्या आहेत.  या हिमनद्या वितळल्यामुळे हजारो हिमनद्यांची सरोवरे तयार झाली आहेत. ही सरोवरे हिमालयाच्या खालच्या भागासाठी धोकादायक आहे. ही सरोवरे  तुटून सिक्कीम, केदारनाथ तसेच चमोलीसारख्या परिसराकत मोठी नैसर्गिक आपत्ती निर्माण करु शकतात. भारतातील अतिशय सुंदर अशा ठिकाणी मोठे नुकसान होवू शकते.

धोकादायक तलावे चिंतेचा विषय

चीनी अकादमी ऑफ सायन्सेसच्या तिबेट पठार संशोधन संस्थेचे शास्त्रज्ञ एसो. प्रो. Weikai Wang आणि त्यांच्या टीमने हिमालयातील हिमनद्यांच्या सरोवरांचे निरीक्षण केले. नेचर कम्युनिकेशनमध्ये त्यांच्या या निरीक्षमाचा अहवाल प्रकाशित झाला आहे. हिमालयाच्या खालच्या भागात तयार होत असलेल्या या धोकादायक तलावांबाबत भारत, चीन, पाकिस्तान, नेपाळ या सर्वा देशांनी तातडीने कारवाई करत धोका निर्माण होण्याआधीच उपाययोजना कराव्यात अशा सूचना देण्यात आल्या आहेत.  

भारत-चीन-पाकिस्ताने एकत्र येणे गरजेचे

हिमालयात निर्माण होत असलेल्या या हिमनद्याच्या धोक्यापासून बचाव करण्यासाठी भारत, चीन आणि पाकिस्तान या सर्व देशांनी एकत्रितपणे काम करणे गरजेचे आहे.  प्रो. Weikai Wang ने सेंटिनेल-2A आणि 2B कडून डेटा घेतला आहे.  2018 ते 2022 पर्यंतचा हा डेटा आहे. यात हिमनदी तलावांचे वर्गीकरण करण्यात आले आहे. हिमनद्यांचा  आकार, स्त्रोत आणि धोक्याच्या आधारावर यांची विभागणी करुन वेगवेगळ्या याद्याप्रमाणे वर्गीकरण खबरदारीच्या उपाययोजना करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

हिमालयात राहणाऱ्यांसाठी धोक्याचा इशारा

हिमनद्यांबाबत भीतीदायक आकडेवारी समोर आली आहे. 5535 हिमतलाव धोकादायक आहेत. यापैकी 1500 तलाव कधीही फुटू शकतात. हिमनदी तलाव फुटण्याच्या घटनेला GLOF - Glacial Lake Outburst Floods म्हणतात. हिमनदी वितळल्याने तयार झालेली ही सरोवरे हिमनदी तुटल्यामुळे फुटू शकतात. हिमस्खलन, भूस्खलन होवू शकते. अशा प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीमध्ये लाखो लिटर पाणी वेगाने खाली येते, ज्यामुळे मोठा विनाश होतो.