Kannauj Girl Accident: उत्तर प्रदेशातील कन्नौज जिल्ह्यातील तालग्राम क्षेत्रातील माधौनगर येथे एका जत्रेचे आयोजन केले होते. या जत्रेत वेगवेगळ्या प्रकारचे पाळणे होते. ज्यामुळे प्रत्येकजणच तेथे आकर्षित होत होता. गावातील मुलांसोबत ही तरुणी देखील त्या जत्रेत गेली होती. तिकडचे आकाशपाळणा तिला आकर्षित करत होते.
जत्रेतील आकाशपाळण्यात बसलेल्या मुलीचा अतिशय भयंकर अपघात झाला आहे. या अपघाताने त्या तरुणीसोबतच संपूर्ण परिसर धक्क्यात आहे. आकाश पाळण्यात ती तरुणी बसल्यावर तिचे केस वाऱ्याच्या झोत्याने उडू लागले. यानंतर पाळणा जोरात फिरु लागल्यावर तिचे केस आकाश पाळण्याच्या लोखंडाच्या रॉडमध्ये अडकले. यानंतर ते जोर जोरात ओरडू लागली.
या सगळ्या गडबडीत आकाशपाळणा सांभाळणाऱ्या माणसाने तो लगेचच थांबवला. तोपर्यंत खूप उशिर झाला होता. मुलीचे संपूर्ण केस डोक्यापासून वेगळे झाले होते. अक्षरशः ते केस कवटीपासून वेगळे होऊन त्या रॉडलाच अडकले होते. त्या मुलीची अवस्था अतिशय बेकार झाली होती.
कवटीपासून मुळापासून उपटले होते केस आणि डोक्यातून रक्त वाहत होतं. या घटनेने ही मुलगी इतकी घाबरली होती की, ती अक्षरशः थर थर कापत होती. या भीषण अपघाताने संपूर्ण परिसर हादरुन गेला आहे.
या घटनेनंतर तरुणीला तात्काळ वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आलं. येथे तिच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. पण परिस्थितीच गांभीर्य पाहता तिला लखनऊ पीजीआय रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तर या घटनेनंतर आकाशपाळणा घेऊन त्याचा मालक तेथून फरार झाला. पीडित तरुणीच्या कुटुंबियांनी सांगितलं की, त्यांनी आकाशपाळणा मालकाचा आधारकार्ड स्वतः जवळच ठेवलं आहे. या घटनेचा संपूर्ण व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये संपूर्ण घटनेची दाहकता दिसून येते.
या प्रकरणाची माहिती पोलिसांनाही देण्यात आली आहे. या संपूर्ण घटनेनंतर संपूर्ण जिल्ह्यात कुठेही अशा मेळ्यांचे आयोजन करण्यात आले आहे. तेथे सुरक्षा व्यवस्था काय आहे? अखेर या मुलीचा एवढा मोठा अपघात कसा झाला, यानंतर तिच्या जीवाला धोका आहे. याबाबत स्थानिक पोलीस प्रशासनाकडून काहीही सांगण्यात आलेले नाही. सध्या स्थानिक पोलीस या प्रकरणाच्या तक्रारीची प्रतीक्षा करत आहेत.