पोरबंदरच्या समुद्रात साडे तीन हजार कोटींचा ड्रग्जचा साठा जप्त

गुजरातच्या किनाऱ्यावर दीड हजार किलोचा ड्रग्स साठा जप्त करण्यात आलाय. भारतीय तटरक्षक दलाने ही कारवाई केलीय.

Updated: Jul 30, 2017, 04:29 PM IST
पोरबंदरच्या समुद्रात साडे तीन हजार कोटींचा ड्रग्जचा साठा जप्त  title=

अहमदाबाद : गुजरातच्या किनाऱ्यावर दीड हजार किलोचा ड्रग्स साठा जप्त करण्यात आलाय. भारतीय तटरक्षक दलाने ही कारवाई केलीय.

पोरबंदरच्या समुद्रात बोटीनं ही ड्रग्स तस्करी करण्यात येत होती. बोटीच्या तळाला दीड हजार किलो ड्रग्स लपवले होते. जप्त करण्यात आलेल्या ड्रग्सचं बाजारमूल्य साडे तीन हजार कोटी असल्याचं सांगण्यात येतंय.

भारतीय तटरक्षक दलाने केलेली ही आजवरील सगळ्यात मोठी कारवाई आहे. हे अंमली पदार्थ पकडण्यासाठी भारतीय तटरक्षक दलाचे जवान गेली दिवस रात्रंदिवस एक विशेष ऑपरेश राबवत होते. गुजरात गुप्तचर विभागाने दिलेल्या माहितीच्या आधारे हे ऑपरेशन सुरु होते. गांधीनगर आणि पोरबंदर भारतीय तटरक्षक दल मुख्यालय विशेष लक्ष ठेवून होते. समुद्र पावक आणि अंकीत या दोन नौका या ऑपरेशनसाठी वापरण्यात आल्या होत्या. 

२७ तारखेला एक अनोळखी जहाज गुजरात समुद्रात संशस्यास्पद हालचाल करताना दिसले. आरओसी आणि आरओएस या गांधीनगर आणि पोरबंदर तटावरील तटरक्षक दलाच्या राज्य मुख्यालयातून या अनोळखी जहाजावर पाळत ठेवली जात होती. शेवटी या जहाजावरील संशयास्पद हालचाली वाढल्या असता हे जहाज ताब्यात घेऊन पोरबंदर तटावर आणलं.

आता तिथे नेव्ही, कोस्टगार्ड, गुप्तचर संस्था, स्थानिक पोलीस, कस्टम विभाग आणि काही तपास यंत्रणा त्या जहाजावरील आठ क्रू मेंम्बर्सची कसून चौकशी करत आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे सर्व क्रू मेम्बर्स भारतीय आहेत. त्यामुळे समुद्रातून पुन्हा मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थांची तस्करी सुरु झालीय का? असा प्रश्न आता निर्माण झालाय.