मध्य प्रदेशमध्ये राजकीय भूकंप घडविणारे हेच ते १९ आमदार, असा दिला धक्का

 मध्य प्रदेशात काँग्रेसचे विद्यमान १९ आमदारांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.

Updated: Mar 10, 2020, 02:33 PM IST
मध्य प्रदेशमध्ये राजकीय भूकंप घडविणारे हेच ते १९ आमदार, असा दिला धक्का title=

भोपाळ : काँग्रेसविरोधात बंडाचा झेंडा हातात घेतलेल्या ज्योतिरादित्य सिंधिया यांनी (Jyotiraditya Scindia) काँगेस पक्षाचा (Congress) राजीनामा दिल्यानंतर ज्योतिरादित्य यांना पाठिंबा देणाऱ्या मध्य प्रदेश काँग्रेसच्या २० पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला आहे. यात काँग्रेसचे विद्यमान १९ आमदारांचा यात समावेश आहे. त्यांनी एकत्रित आपला राजीनामा राजभवनात पाठवून दिला आहे. 

हे आहेत आमदार

या आमदरांमध्ये प्रदुम्न सिंह तोमर, रघुराज कंसाना, कमलेश जाटव, रक्षा संत्राव (भांडेर), जसपाल सिंह जज्जी (अशोक नगर), इमरती देवी, प्रभुराम चौधरी, तुलसी सिलावट, सुरेश धाकड (शिवपुरी), महेंद्र सिंह सिसोदिया, ओपी एस भदौरिया, रणवीर जाटव, गिरज दंडोतिया, जसवंत जाटव, गोविंद राजपूत, हरदीप डंग, मुन्ना लाल गोयल, ब्रिजेंद्र यादव यांचा समावेश आहे.

आणखी आमदार भाजपच्या संपर्कात?

काँग्रेसचे आणखी एक आमदार बिसाहु लाल सिंह यांनीही राजीनामा दिला आहे. बिसाहू लाल सिंह यांनी काँग्रेस आणि आमदार पदाचा राजीनामा दिला आहे. आपली काँग्रेस पक्षा उपेक्षा झाल्याचे सांगत त्यांनी पदाचा राजीनामा दिला. दरम्यान, काँग्रेसचे आणखी सात आमदार भाजपच्या संपर्कात आहेत, अशी माहिती मिळत आहे. हे सातही आमदार आज रात्रीपर्यंत राजीनामा देण्याची शक्यता आहे. ते विधानसभा अध्यक्षांकडे राजीनामा देऊ शकतात. 

दरम्यान, काँग्रेसने आक्रमक होत ज्योतिरादित्य सिंधिया यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. १९ समर्थक आमदारांनीही विधानसभा अध्यक्षांकडे राजीनामे पाठवले आहेत. यात सहा मंत्र्यांचाही समावेश आहे. त्यामुळे मध्य प्रदेशातल्या कमलनाथ सरकारवरील संकट अधिक गडद झाले आहे. ज्योतिरादित्य यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधीकडे आपला राजीनामा पाठवला. विशेष म्हणजे राजीनामा पत्रावर कालची तारीख आहे. त्यामुळे ज्योतिरादित्यांनी कालच आपला राजीनामा तयार केल्याचे स्पष्ट झाले आहे.