खासगी व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन २० वर्षीय मुलीवर २ वर्षे सामुहिक अत्याचार; पोलिसांचाही हलगर्जीपणा उघड

राज्यस्थानच्या अलवर जिल्ह्यातील एका विद्यार्थीनीवर सामुहिक बलात्काराची घटना समोर आली आहे. 

Updated: Jul 2, 2021, 06:15 PM IST
खासगी व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन २० वर्षीय मुलीवर २ वर्षे सामुहिक अत्याचार; पोलिसांचाही हलगर्जीपणा उघड title=

अलवर : राज्यस्थानच्या अलवर जिल्ह्यातील एका विद्यार्थीनीवर सामुहिक बलात्काराची घटना समोर आली आहे. आरोपी गेल्या २ वर्षांपासून २० वर्षीय तरुणीवर सामुहिक अत्याचार करीत होते. पोलिसांनी संपूर्ण प्रकरणात ३ आरोपींना अटक केली आहे. आरोपींनी विद्यार्थीनीचा व्हिडिओ बनवला होता. जो व्हायरल करण्याची धमकी देऊन तिला वारंवार ब्लॅकमेल केले जात असे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३ आरोपींना अटक करण्यात आली आहे. २ आरोपींवर सामुहिक अत्याचार आणि अपहरणाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. एफआयआरमध्ये मालखेडा पोलिसांवर रिपोर्ट नोंदवून न घेतल्याचाही आरोप लावला आहे. पोलिसांच्या हलगर्जीपणाचीदेखील चौकशी केली जाणार आहे.

पीडितेने 2019 मध्ये मालखेडा पोलिसांत तक्रार नोंदवण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली नाही. आरोपींच्या विरोधातदेखील कोणतीच कारवाई झाली नाही. 

अलवर पोलीस स्टेशनमध्येदेखील तक्रार नोंदवण्यासाठी पीडितेला मोठा संघर्ष करावा लागला. त्यानंतर कुठे तिच्यावर झालेल्या अत्याचाराची दखल घेतली गेली. परंतु पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे मुलीला २ वर्ष नराधमांची शिकार व्हावं लागलं.

तरुणीचा  खासगी व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन वारंवार सामुहिक अत्यार करण्यात आला. याप्रकऱणी अखेर पोलीस पुढील तपास करीत आहेत.