भारतात कर्करोगाचे २२ लाख रूग्ण, दरवर्षी पावणे आठ लाख लोकांचा मृत्यू

कॅन्सर भारतात हातपाय पसरवतोय....

Updated: Feb 4, 2019, 02:08 PM IST
भारतात कर्करोगाचे २२ लाख रूग्ण, दरवर्षी पावणे आठ लाख लोकांचा मृत्यू title=

मुंबई : भारत कर्करोगाच्या रूग्णांची राजधानी झाल्याचं धक्कादायर सत्य समोर आलं आहे. भारतात कर्करोगाचे २२ लाख रूग्ण असून कर्करोगाने दरवर्षी पावणे आठ लाख जणांचा मृत्यू होत असल्य़ाची माहिती समोर आली आहे. भारतात कर्करोग हातपाय पसरतो आहे. थेट मृत्यूचा निरोप घेऊन येणाऱ्या कर्करोगाच्या रूग्णांची संख्या भारतात झपाट्यानं वाढली आहे. तंबाखूजन्य पदार्थांचं सेवन, मद्यपान, चुकीचा आहार, किरणोत्सर्ग, प्रदूषण, संप्रेरक उपचार पद्धती म्हणजे हार्मोन रिप्लेसमेंट थेरपीमुळे कॅन्सरच्या रूग्णांची संख्या भारतात वाढू लागली आहे. कारणं अनेक असली तरी भारतात तंबाखूजन्य पदार्थांमुळे कर्करोगाचं प्रमाण मोठं आहे. 

भारतात सध्या २२ लाख ५० हजार कर्करोगाचे रूग्ण आहेत. यात दरवर्षी ११ लाख ५७ हजार रूग्णांची दरवर्षी भर पडते. तर कर्करोगामुळं दरवर्षी साधारण ७ लाख ८४ हजार रूग्णांचा मृत्यू होतो. कर्करोग असाध्य नाही. पहिल्या पातळीवरच कर्करोगाचं निदान झाल्यास उपचारानं तो बरा होऊ शकतो. असा विश्वास तज्ज्ञ व्यक्त करतात.

कर्करोग झाल्यास बहुतांश रूग्ण खचून जातात. निराशेच्या गर्तेत जातात. खचून जाण्यापेक्षा कर्करोगाशी दोन हात करून त्यावर मात करण्यासाठी सकारात्मक दृष्टीकोनानं विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे.

भारतातील महिलांमध्ये स्तनांच्या व गर्भाशयाच्या कर्करोगाचे प्रमाण सर्वाधिक आहे. स्तनांच्या कर्करोगाचे निदान झालेल्या दर दोन नव्या महिला रुग्णांपैकी एकीचा मृत्यू होतो असेही आढळून आले आहे. भारतातील सुमारे २२.५० लाख व्यक्ती कर्करोगाने ग्रस्त आहेत. दरवर्षी ११,५७,२९४ नव्या कर्करुग्णांची नोंद होत आहे आणि कर्करोगामुळे होणाऱ्या मृत्यूंची आकडेवारी ७,८४,८२१ इतकी आहे.

धूम्रपान करणाऱ्यांच्या यादीत त्रिपुरा (48 टक्के ), मणिपूर (47.7 टक्के ), ओडिशा (42.9 टक्के ) आणि आसाम (41 टक्के ) तर सगळ्यात कमी प्रभावित राज्यांमध्ये हिमाचल प्रदेश (3.1 टक्के ), जम्मू आणि काश्मीर (4.3 टक्के ), पुदुचेरी (4.7 टक्के ) आणि केरळ (5.4 टक्के).