नवी दिल्ली : 'भारताचा स्वर्ग' अशी ओळख असलेल्या काश्मीरमधील नागरिकांचं जीवन इंतकं सोपं नाहीये जितका आपण विचार करत असतो. जम्मू-काश्मीरमधील सौंदर्य हे पाहण्यासारखं असतं मात्र, तेथील रहिवाशांचं आयुष्य तितकचं खडतर असतं.
जम्मू-काश्मीरमधील निसर्ग, तसेच प्रतिभावंत तरुणांच्यामुळे या ठिकाणाला एक वेगळं महत्व निर्माण झालं आहे. याचं एक उदाहरण म्हणजे एका २२ वर्षांच्या तरुणाने केलेला कारनामा.
जम्मू काश्मीरमधील २२ वर्षीय हामिद अजीजने एका अल्ट्रा मॅरेथॉनमध्ये एका दिवसात ११० कि.मी. धावत नवा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे.
हामिदने ११० कि.मी. धावण्याचा रेकॉर्ड १० तास ४५ मिनिटांत केला आहे. यापूर्वी हामिदने ६० किलोमीटर धावण्याचा विक्रम केला होता.
J&K: 22-year-old athlete from Srinagar, Hamid Aziz, completes ultra marathon run of 110 km in 10 hours 45 minutes; becomes the first person from the state to run for a distance of more than 100 km in a single day. pic.twitter.com/86EPGaDvHk
— ANI (@ANI) November 13, 2017
हामिदने हा रेकॉर्ड केल्यानंतर म्हटलं की, "हे माझ्यासाठी खूपच कठीण काम होतं, मला केवळ रेकॉर्ड करायचा होता आणि तो मी केला".
या रेकॉर्डचं श्रेय हामिदने ऑस्ट्रेलियाच्या ५५ वर्षीय धावपटूला दिलं आहे. हामिदने म्हटलं की, ५५ वर्षीय वयोवृद्ध अल्ट्रा मॅरेथॉनमध्ये सहभागी होऊ शकतो तर मग मी का नाही?".
हामिदने पूढे म्हटलं की, "येत्या काळात १८० किलोमीटर नॉन स्टॉप धावण्याचा भारतीय रेकॉर्ड तोडण्याची तयारी मी करत आहे. मला ३०३ किलोमीटर धावण्याचाही वर्ल्ड रेकॉर्ड करायचा आहे".