राज्यात दोन महिन्यांत 25 बळी, उष्माघाताबाबत केंद्र सरकारकडून या महत्वाच्या सूचना

Heat Stroke Guidelines : राज्यात दोन महिन्यात उष्माघाताचे 25 बळी गेलेत. ही गेल्या आठ वर्षांतील उच्चांकी नोंद आहे. 374 जणांना उष्माघाताची बाधा झाली आहे. दरम्यान, उष्माघाताबाबत केंद्र सरकारने राज्यांना पत्र लिहून सज्ज राहण्याच्या सूचना केल्या आहेत. ( Central Government Guidelines)  

Updated: May 2, 2022, 08:44 AM IST
राज्यात दोन महिन्यांत 25 बळी, उष्माघाताबाबत केंद्र सरकारकडून या महत्वाच्या सूचना title=

मुंबई :  Heat Stroke Guidelines : राज्यात दोन महिन्यात उष्माघाताचे 25 बळी गेलेत. ही गेल्या आठ वर्षांतील उच्चांकी नोंद आहे. 374 जणांना उष्माघाताची बाधा झाली आहे. दरम्यान, उष्माघाताबाबत केंद्र सरकारने राज्यांना पत्र लिहून सज्ज राहण्याच्या सूचना केल्या आहेत. ( Central Government Guidelines) उष्माघाताबाबत राज्यांनी केंद्राच्या गाईडलाईन्सचं पालन करावे, नॅशनल अॅक्शन प्लॅनवर लक्ष केंद्रीत करावं असं केंद्राने पत्रात म्हटले आहे. 

केंद्रा सरकाकडून जारी करण्यात आलेल्या सूचनांमध्ये नमुद करण्यात आले की, राज्यांच्या आरोग्यमंत्रालयांनी नियमावली तयार करावी, आरोग्य सुविधा वाढवाव्या, उष्माघाताशी संबंधित औषधांचा पुरेसा साठा तयार ठेवावा असं केंद्र सरकारने म्हटलंय. सलाईन, आईसपॅक, ओआरएस, पेयजल यांचा पुरेसा पुरवठा करावा अशा सूचना देण्यात आल्यात. 

महाराष्ट्र राज्यात दोन महिन्यात उष्माघाताचे 25 बळी गेलेत. ही गेल्या आठ वर्षांतील उच्चांकी नोंद आहे. 374 जणांना उष्माघाताची बाधा झालीय. सर्वाधिक म्हणजे तब्बल 44 टक्के मृत्यू हे नागपूरमध्ये आहेत. विदर्भात सध्या बहुतांश भागात पारा 45 अंशांच्या पुढे आहे. नागपूरमध्ये 11 जणांचा तर जळगावात 4 जणांचा बळी गेलाय. उष्माघाताच्या त्रासाने रूग्णालयात दाखल झालेल्यांचं प्रमाणही मोठं आहे. विदर्भासह मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रातही होरपळ सुरु आहे. 

 अवकाळी पावसाने नुकसान

विदर्भातील रविवारी जोरदार पाऊस कोसळला.देशातील विक्रमी तापमान विदर्भात असल्याने पावसामुळे थोडासा दिलासा मिळालाय. वर्धा,अमरावतीत मेघगर्जना आणि वादळी वा-यासह जोरदार पाऊस बरसला. या पावसामुळे शेतातील भाजीपाला, आंबा, लिंबासह पिकांचे काही प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.

वर्ध्यात 45.1 अंशावर पोहोचल्याने अनेकांना उन्हाचा तडाखा बसला होता. यात पाऊस पडल्याने दिलासा मिळाला. पण, अचानक आलेल्या या पावसामुळे कारंजा शहरातील उप बाजार समिती प्रांगणात साठवून ठेवण्यात आलेला शेतमाल भिजला आहे. यामध्ये गहू, हरभरा, तूर भिजल्याने शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे.