lal Bihari: 29 वर्षांचा नवरा 67 वर्षांच्या वधूशी लग्न करणार असल्याचे वृत्त समोर आले आहे. हे त्यांचे पहिले लग्न नसून ते पुनर्विवाह करणार आहेत. या लग्नात त्यांची नातवंडेही हजर राहणार आहेत. अशावेळी 29 वर्षाच्या तरुणाला 67 वर्षाच्या नवरीत असं काय दिसलं? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. बर..आता हा 29 वर्षांत पुनर्विवाह करत असेल तर मग त्याचे पहिले लग्न कधी झाले असेल? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. नाही तर पुन्हा लग्न करणार आहे. तर सगळ्याचे उत्तर सरकारी लालफीतीच्या कारभारात मिळेल. सरकारी काम आणि 10 दिवस थांब असे तुम्ही ऐकले असेल. त्याचीच प्रचिती या वराला आली आहे.
उत्तर प्रदेशातील आझमगडमधील लाल बिहारी या वराची ही गोष्ट आहे. सरकारी कागदपत्रांवर लालबिहारींना 'मृत' होऊन अनेक वर्षे झाली आहेत. बरीच वर्षे 'मृत' होऊनही नंतर ते कागदावर जिवंत झाले आहेत. लाल बिहारी हे आझमगड जिल्ह्यातील मुबारकपूर पोलीस स्टेशन हद्दीतील अमिलो गावातील रहिवासी आहेत. ते 30 जुलै 1976 ते 30 जून 1994 या काळात सरकारी नोंदींमध्ये मृत राहिले. लाल बिहारी यांनी दिलेल्या प्रदीर्घ लढाईनंतर प्रशासनाने जून 1994 मध्ये त्यांचे अस्तित्व मान्य केले आणि त्यांना जिवंत घोषित केले. मात्र प्रशासनाने त्यांच्या मृत्यूची फाईल गायब केली. लाल बिहारींवर एक चित्रपट तयार करण्यात आला असून त्याचे दिग्दर्शन सतीश कौशिक यांनी केलंय.
स्वत:ला जिवंत आहे हे सिद्ध करण्यासाठी लालबिहारी यांनी सप्टेंबर 1986 मध्ये विधानसभेत कागदी गोळे फेकले. 1988 मध्ये त्यांनी अलाहाबादमधून माजी पंतप्रधान व्हीपी सिंह आणि कांशीराम यांच्या विरोधात पोटनिवडणूक लढवली होती. 1989 मध्ये त्यांनी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या विरोधात लोकसभा निवडणूक लढवली, पण त्यांना न्याय मिळाला नाही. आपल्यावर गुन्हा दाखल व्हावा म्हणून त्यांनी पुतण्याचे अपहरणही केले पण गुन्हा दाखल झाला नाही. प्रदीर्घ संघर्षानंतर लालबिहारी मृतांच्या नोंदींमध्ये जिवंत झाले. त्यांनी मृत संघटना स्थापन करण्याचा आणि कागदपत्रांमध्ये मृत घोषित केलेल्या लोकांना पुन्हा जिवंत करण्याचा संकल्प केला. आतापर्यंत त्यांनी 1000 हून अधिक लोकांना कागदावर जिवंत केले आहे. यासाठी त्यांनी 47 वर्षे असा प्रदीर्घ लढा दिला.
लाल बिहारी यांचे आताचे खरे वय 69 असले तरी प्रशासनाच्या कागदावर काही भलतेच आहे. लाल बिहारींना कागदावर पुनरुज्जीवित केल्यापासून त्यांच्या वयात भर पडत आहे. त्यानुसार आता त्यांचे वय 29 वर्षे सांगत आहे. दरम्यान ते पुन्हा एकदा आपल्या 67 वर्षांच्या पत्नीशी दुसरं लग्न करणार आहेत. याबाबतच्या चर्चेला सध्या उधाण आले आहे. पुनर्विवाहासाठी जागा निवडण्याबाबत सध्या चर्चा सुरू असल्याचे सांगितले जात आहे.