Pakistan Google searches 2024: जगाच्या पाठीवर असा क्वचितच एखादा प्रश्न असेल ज्याचं उत्तर गुगलकडे नाही. कितीही कठिणातील कठीण प्रश्न असो, त्या प्रश्नाचं उत्तर गुगलकडे हमखास मिळतं. ब्रेकअपपासून, क्रिकेट मॅचपर्यंत आणि स्किनकेअरपासून शिक्षणासंबंधीच्या प्रश्नापर्यंत गुगल कायमच युजर्सच्या प्रश्नाची उत्तरं देण्यासाठी सज्ज असतं. अशा या माध्यमाचा वापर जगातील अनेक मंडळी करतात. पाकिस्तानातही गुगलचा मोठा वापर केला जातो. आश्चर्याची बाब म्हणजे पाकिस्तनातील युजर्सना पडणारे प्रश्नही अतिशय अनपेक्षित आहेत बरं.
2024 या वर्षभरात पाकिस्तानी नागरिकांनी गुललला असे काही प्रश्न विचारले की, हे पाहून सध्या एकच हशा पिकतोय. क्रिकेटचा सामाना कुठे आणि कसा पाहावा या प्रश्नासमवेतच कार खरेदीपर्यंतच्या प्रश्नांची उत्तरं इथं गुगललला विचारण्यात आली.
पाकिस्तानमधील नागरिक कायमच काही ना काही नव्या कारणांनी चर्चेत असतात. यावेळीसुद्धा ही मंडळी त्यांच्या चित्रविचित्र प्रश्नांसाठी चर्चेत आली आहेत.