पटना : कोरोनाचा फैलाव देशभरात वाढतच आहे. दिवसेंदिवस देशात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ असून मृतांचा आकडाही वाढत असल्याचं चित्र आहे. बिहारमध्ये कोरोनामुळे आणखी एकाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. 38 वर्षीय व्यक्तीचा पटनामधील AIIMS रुग्णालयात मृत्यू झालाय.
बिहार | कोरोनाचा आणखी एक बळी
पटनामध्ये 38 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू
देशात कोरोनाचा 6वा बळी https://t.co/HOK58cBO5u#Covid_19india #coronavirusindia #bihar #patna— ZEE २४ तास (@zee24taasnews) March 22, 2020
सैफ अली असं 38 वर्षीय मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव असून तो बिहारमधील मुंगेर येथे राहणार होता. काही दिवसांपूर्वीच तो कतारहून परतल्याची माहिती AIIMS रुग्णालयाच्या संचालकांनी दिली आहे.
A 38-year-old man has passed away in Bihar today due to kidney failure; he has been tested positive for #Covid19. He was from Munger. He died yesterday at AIIMS in Patna; had returned from Kolkata two days back: Dr. Prabhat Kumar Singh, AIIMS Patna, Bihar pic.twitter.com/H1xDi1VSJM
— ANI (@ANI) March 22, 2020
शनिवारी किडनी फेल झाल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. मात्र हा रुग्ण कोरोना व्हायरस संशयित होता. त्याची कोरोना चाचणी करण्यात आली होती. या व्यक्तीची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती.