भारतात या 5 ठिकाणी तुम्ही कधीही करु शकता पिकनिकचा प्लॅन

भारतात फिरण्य़ासाठी 5 सुंदर जागा

Updated: Jul 31, 2018, 09:29 AM IST
भारतात या 5 ठिकाणी तुम्ही कधीही करु शकता पिकनिकचा प्लॅन title=

मुंबई : पिकनिकसाठी अनेक जागा अशा असतात ज्यासाठी तुम्हाला आधी तेथील हवामान पाहावं लागतं. थंडीमध्ये अनेक जण हिल स्टेशनला जाण्यास उत्सूक असतात. पण अशा अनेक जागा आहेत जेथे तुम्हाला तेथील हवामान पाहण्याची गरज नसते. तुम्ही या ठिकाणी कधीही फिरायला जावू शकता.

Image result for kerala tourism zee

1. केरळ

चारही बाजुला हिरवळ आणि सुंदर दृष्य ही केरळची विशेषता आहे. ही जागी अनेक जण लग्नानंतर हनीमूनला येतात. उन्हाळ्यात देखील अनेक पर्यटकांना करळंचे समुद्र किनारे आपल्याकडे आकर्षित करतात.

कसे पोहचावे - दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकाता येथून तुम्ही ट्रेनने केरळला पोहचू शकता. विमानाने जाण्याचा विचार असेल तरी देखील तुम्ही येथे पोहचू शकता.

Image result for jaipur city zee

2. जयपूर

जयपूरही मेवाडची शान आणि रॉयल अंदाज यासाठी ओळखली जाते. जयपूर देखील वर्षभर पर्यटकांनी गजबजलेलं असतं. येथील मुख्य आकर्षण आहे ते म्हणजे येथील राजवाडे आणि येथील पदार्थ. हवा महल, आमेर किल्ला, वास्तूकला येथे पाहण्यासारखे आहेत.

कसे पोहचावे - तुम्ही बस, ट्रेनने येथे पोहचू शकता. विमानाने देखील जयपूरला तुम्ही येऊ शकता.

Image result for kanyakumari beautiful zee

3. कन्याकुमारी

कन्याकुमारी समुद्राने वेढलेला भारताता सर्वात खालचा भाग आहे. येथे सुर्यास्त पाहण्यासाठी अनेक मैलाचा प्रवास करुन पर्यटक येतात. कन्याकुमारीला केप कोमोरिन म्हणून देखील ओळखलं जातं.

कसे पोहचावे - कन्याकुमारीला पोहोचण्यासाठी विमानतळ 100 किमी अंतरावर आहे. त्रिवेंद्रम आंतरराष्ट्रीय विमानतळावर तुम्हाला उतरावं लागेल. रेल्वेने देखील तुम्ही कन्याकुमारीला पोहोचू शकतो.

Image result for goa zee

4. गोवा

गोवा परदेशी पर्यटकांप्रमाणे भारतीय पर्यटकांसाठी देखील कूल डेस्टिनेशन आहे. उन्हाळ्यात आणि न्यू ईयर येथे मोठ्या प्रमाणावर पर्यटकांची गर्दी असते. गोव्याचं सीफूड, गोवा किल्ला, चोपारा किल्ला हा पर्यटकांसाठी आकर्षणाचं केंद्र असतं. येथे वर्षभर पर्यटक येत असतात.

कसे पोहचावे - मुंबई येथून बसने तुम्ही गोव्याला पोहोचू शकता. इतर शहरांशी देखील गोवा जोडलेला आहे. रेल्वेने देखील तुम्ही जावू शकतात. कोंकण रेल्वे (मुंबई ते बंगळुरु) सर्वाधिक आकर्षक रेल्वेमार्ग आहे. ही रेल्वे लाईन गोव्यातून जातात. मुंबई, दिल्ली, बंगळुरु, कोचिन आणि तिरुअनंतपुरम येथून गोव्याला येण्य़ासाठी सरळ विमान आहे.

Related image

5. काश्मीर

धरतीवरचा स्वर्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काश्मीरला देखील पर्यटकांची गर्दी असते. हनीमूनसाठी देखील या जागेला पसंती दिली जाते. सुंदर डोंगर आणि पदार्थ येथील आकर्षण आहे. 

कसे पोहचावे - रेल्वेने तुम्ही उधमपूरपर्यंत येऊ शकतात. यानंतर तुम्ही टॅक्सीने प्रवास करु शकतात. येथे बसने पोहोचण्यासाठी देखील 2 मार्ग आहेत. एक जम्मूकडून तर दुसरा हिमाचल प्रदेश येथून मनाली मार्गे तुम्ही काश्मीरला येऊ शकता. तुम्ही जर विमानाने येण्याचा विचार करत असाल तर तुम्ही जम्मू-कश्मीर आणि लेह विमानाने येथे येऊ शकता.