इन्वेस्टमेंट गुरू Warren Baffet यांच्या 5 सर्वोत्तम गोष्टी; तुम्हालाही करतील श्रीमंत

संपूर्ण जगात प्रसिद्ध असलेले इन्वेस्टमेंट गुरू Warren Buffet यांना असंख्य लोकं फॉलो करतात. गुंतवणूकीच्या बाबतीत त्यांच्या टीप्स फॉलो करा

Updated: Jul 24, 2021, 07:28 AM IST
इन्वेस्टमेंट गुरू Warren Baffet यांच्या 5 सर्वोत्तम गोष्टी; तुम्हालाही करतील श्रीमंत

मुंबई : शेअर मार्केटमधून पैसे कमावने सोपे नाही. यामध्ये तुमचे ज्ञान, स्ट्रॅटेजी, तज्ज्ञांचा सल्ला खुपच गरजेचा आहे. संपूर्ण जगात प्रसिद्ध असलेले इन्वेस्टमेंट गुरू Warren Buffet यांना असंख्य लोकं फॉलो करतात. गुंतवणूकीच्या बाबतीत त्यांच्या टीप्स फॉलो करा.Warren Buffet’s Investment Tips

संपूर्ण माहिती आणि नियोजनासह लावा पैसा
गुंतवणूक करताना तुमच्याकडे काहीना काही प्लॅन असायला हवा. कारण विना लक्षाची गुंतवणूक फायद्याची ठरत नाही. भरपूर नफा, व्याज, परतावा देणाऱ्या योजनांपासून सावध रहा. तुम्हाला या योजनेत गुंतवणूक करून पैसे कसे वाढतील हे माहित नसेल, तर अशा योजनांपासून दूर राहणेच योग्य आहे.

बाजारात गुंतवणूक म्हणजे लॉटरी खरेदी करण्यासारखे नाही.

बाजारात गुंतवणूक करणे म्हणजे लॉटरीचे टिकीट खरेदी करण्यासारखे नाही. जसे की तुम्ही एका रात्रीत श्रीमंत व्हाल. यशस्वी गुंतवणूकदार बनन्यासाठी चांगल्या कंपन्यांची निवड करणे गरजेचे असते. आपल्यासाठी गुंतवणूकीचा पोर्टफोलियो तयार करणे ही एक दीर्घ प्रक्रिया आहे. त्यासाठी खूपच संयम ठेवावा लागतो. लवकरात लवकर श्रीमंत होण्याच्या लोभामूळे नुकसान होऊ शकते. गुंतवणूकीसाठी निवडलेल्या कंपनीचे मॅनेजमेंट व्यवस्थित असायला हवे. फक्त जाहिरातींवरून कंपनी योग्य आहे असे ठरवू नये.

डायवर्सिफिकेशनची मदत घ्या
आपले सर्व अंडे कधीही एका टोकरीत ठेऊ नये. हाच फार्मुला गुंतवणूकीसाठी सुद्धा लागू आहे. तुमच्याकडे गुंतवणूकीसाठी असलेला पैसा वेगवेगळ्या ठिकाणी विभागून लावायला हवा. पूर्ण पैसा कधीही डेटमध्ये लावू नका, तसेच पूर्ण पैसा कधीही इक्विटीतही लावू नका. गुंतवणूकीमध्ये संतुलन ठेवा.

कंपनीची बिझनेस क्वॉलिटी बघा
कोणत्याही नव्या कंपनीत गुंतवणूक करताना तुमच्या मनात प्रश्न पडायला हवा की, संबधीत कंपनीचा बिझनेसची गुणवत्ता काय? तसेच आपल्या ग्राहकांसाठी त्यांची सर्विस कशी आहे. या बाबींचा गुंतवणूक करताना विचार करावा. एका चांगल्या कंपनीचे शेअर जास्त किंमतीत खरेदी करण्यापेक्षा एका प्रगतीशील कंपनीचा स्वस्त शेअर खरेदी केलंलं कधीही चांगलं.

लॉंग टर्मचा विचार करा
शेअर खरेदी केल्यानंतर लगेच विकून देण्यापेक्षा, चांगल्या कंपनीची निवड करून दीर्घ अवधीसाठी गुंतवून ठेवणे कधीही योग्य असते. चांगल्या बिझनेसची वॅल्यु वेळेसोबत वाढत राहते. सोबतच शेअरची किंमतही वाढत राहते. म्हणूनच चांगल्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केल्यानंतर चांगल्या परताव्यासाठी संयम ठेवणे गरजेचे आहे.