शेतकऱ्याने साठवलेल्या मेहनतीच्या पैशांचा उंदरानं केला चुरा...शेतकऱ्याला मिळेल का भरपाई?

त्याने स्वत: मेहनत करुन 2 लाख रुपये जमा केले होते आणि कर्ज घेऊन 2 लाख रुपये मिळवले होते

Updated: Jul 23, 2021, 10:07 PM IST
शेतकऱ्याने साठवलेल्या मेहनतीच्या पैशांचा उंदरानं केला चुरा...शेतकऱ्याला मिळेल का भरपाई?

मेहबुबाबाद : कोणाचं नशीब कोणाला कुठे घेऊन जाईल किंवा काय करायला लावेल याचा काही नेम नाही, तुम्ही विचार करा की, तुम्ही मेहनतीने अनेक वर्ष पैसे जमा कले असेल, परंतु तुम्हाला नंतर समजले की, ते पैसे काहीच कामाचे नाही तर? तर तुमच्यावर काय परिस्थिती येईल? कदाचित तुमच्याकडे यावर उत्तर नसेल. कारण असे झाल्यावर हतबल होण्याखेरीज दुसरा कोणताच मार्ग समोर दिसत नाही. तमिळनाडूमधील एका गरीब शेतकऱ्याची देखील अशीच अवस्था झाली आहे. आधीच तो गरीब त्यात मेहनतीने जमा केलेल 4 लाख रुपये उंदराने कुडतडले. ज्यामुळे या शेतकऱ्याची झोपच उडाली आहे. आधीच फाटकं नशीब, त्यात उंदराने त्यांच्यावर काळ आणला.

ही धक्कादायक घटना मेहबुबाबादमधील इंदिरानगर आदिवासी विभागातील आहे. या भागातील रेड्या नाईक नावाचा शेतकरी बाजारात भाज्या विकून आपले दिवस काढत आहे. त्याला एक गंभीर आजार आहे. ज्यावर उपचार करण्यासाठी तो अनेक वर्षापासून पैसे जमा करत होता.

त्याने स्वत: मेहनत करुन 2 लाख रुपये जमा केले होते आणि कर्ज घेऊन 2 लाख रुपये मिळवले होते. जे त्यानं लोखंडी कपाटात सुरक्षीत ठेवले होते.

रुग्णालयात जाण्यापूर्वी रेड्याने पैसे घेण्यासाठी हे कपाट उघडले आणि त्याच्या पाया खालची जमीनच सरकली. त्याने समोर पाहिले की, इतक्या वर्षांपासून त्याने जे मेहनतीने पैसे कमवले होते ते आता त्याच्या काहीच कामाचे नाही. कारण त्याला उंदराने कुडतडले होते आणि एक दोन नाही तर 44 हजार रुपयांच्या नोटांना उंदराने कुडतडले होते.

एका वृताशी बोलताना रेड्या नाईक यांनी सांगितले की, "मी हे पैसे घेऊन अनेक बँकेत गेलो, परंतु सगळ्यांना मला हेच उत्तर दिले की, हे पैसे आता अमान्य आहे. मी अनेक बँकेच्या मॅनेजरसोबत बोललो परंतु याचा काही एक फायदा झाला नाही. मला एका बँक अधिकाऱ्याने सांगितले की, हैदराबादच्या रिझर्व बँकेते जाऊन पाहा तिथे काम झालं तर, पण याचा काहीच फायदा झाला नाही मला आता मदतीची गरज आहे."

हे प्रकरण व्हायरल झाल्यानंतर तेलांगनातील महिला आणि बाल विकासमंत्री सत्यवती राठोड, तसेच मेहबुबाबादधील कलेक्टर यांनी या घटनेत लक्ष घालून तेलांगनाच्या मुख्यमंत्र्यांकडून रेड्याला मदत मिळण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे आता रेड्याचे टेन्शन थोडे कमी झाले असले तरी, त्यांची शस्त्रक्रिया अद्याप झालेली नाही.