PM Modi : 'मी काय काम करतो?' पंतप्रधान मोदींच्या प्रश्नाला 5 वर्षाच्या चिमुकलीने दिलं मजेशीर उत्तर

उज्जैनचे खासदार अनिल फिरोजिया यांनी त्यांच्या कुटुंबियांसह पंतप्रधान मोदींची भेट घेतली

Updated: Jul 27, 2022, 10:22 PM IST
PM Modi : 'मी काय काम करतो?' पंतप्रधान मोदींच्या प्रश्नाला 5 वर्षाच्या चिमुकलीने दिलं मजेशीर उत्तर title=

PM Modi met 5 year old Kid: भाजप खासदाराच्या 5 वर्षाच्या मुलीने पंतप्रधान मोदींची (PM Modi) घेतलेली भेट सध्या चर्चेचा विषय आहे. या भेटी दरम्यान एका प्रश्नाचे उत्तर देताना खुद्द पंतप्रधान मोदींनाही हसू आवरले नाही. पंतप्रधान मोदींनी मध्य प्रदेशातील उज्जैनचे खासदार अनिल फिरोजिया (Anil Firojiya) आणि त्यांच्या कुटुंबीयांची संसद भवनात भेट घेतली. त्यानंतर खासदार अनिल फिरोजिया यांनी या भेटीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

फिरोजिया यांच्या पाच वर्षाच्या मुलीचे नाव अहाना आहे. भेटीदरम्यान पंतप्रधान मोदींनी ५ वर्षांच्या अहानाला विचारले की तिने त्यांना ओळखले का? अहानाने या प्रश्नावर हो असे म्हटले.  'हो. तुम्ही मोदी आहात आणि रोज टीव्हीवर येता, असे उत्तर अहानाने दिले.

यानंतर पंतप्रधानांनी अहानाला विचारले की मी करतो ते तुला माहीत आहे का? असे विचारले. यावर अहानाने  हो, तुम्ही लोकसभेत काम करता असे उत्तर दिले.

मुलीचा निरागसपणा पाहून सगळेच थक्क 

अहानाचे हे उत्तर ऐकून पंतप्रधान मोदींसह उपस्थित सर्वजण हसू लागले. मुलीने इतके निरागसपणे उत्तर दिले की कोणालाही हसू आवरता आले नाही. त्यानंतर पंतप्रधान मोदींनी अहानाला चॉकलेट दिले.

पंतप्रधानांचाही फिरोजिया यांना वजन कमी करण्याचा सल्ला

या भेटीत पंतप्रधान मोदींनी वजन कमी केल्याबद्दल अहानाच्या वडिलांचे कौतुक केले आणि आता आणखी वजन कमी करण्याची गरज असल्याचे सांगितले. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनीही अनिल फिरोजिया यांना वजन कमी करण्याचा सल्ला दिला आहे.  गडकरी म्हणाले होते की प्रत्येक किलोग्रॅममागे त्यांना त्यांच्या क्षेत्रासाठी एक हजार कोटी रुपये मिळतील. गेल्या काही दिवसांत फिरोजिया यांचे वजन २१ किलो कमी झाले आहे.