5G महाग असणार की स्वस्त? किती रुपयांचा असणार रिचार्ज ?

भारतात 5 जी सेवा सुरु झाली आहे. 4 जी पेक्षा 5 जी किती महाग असणार आहे. जाणून घ्या.

Updated: Oct 1, 2022, 03:57 PM IST
5G महाग असणार की स्वस्त? किती रुपयांचा असणार रिचार्ज ? title=

Jio 5G Recharge Plan: भारतात आजपासून 5G सेवा सुरु झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते याचा शुभारंभ करण्यात आला आहे. आजपासून अनेक शहरांमध्ये ही 5G सेवा मिळणार आहे. पण 5 जी सेवा महाग असेल की स्वस्त याबाबत अजून खुलासा झालेला नाही. तुम्हाला 5 जी सेवेसाठी किती रुपयांचा रिचार्ज करावा लागेल हे स्पष्ट झालेले नाही. उद्योगपती मुकेश अंबानी यांनी यावेळी बोलताना याबाबत खुलासा केला आहे.
   
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM narendra Modi) यांनी भारतात आज 5G सेवा लॉन्च केली आहे. 5G चे जाळे येणाऱ्या काही महिन्यात संपूर्ण देशात पसरेल. पण यासाठी वेगळा रिचार्ज करावा लागणार का? किती रुपयांचा हा रिचार्ज असेल. याबाबत काही अंदाज वर्तवले गेले आहेत.

'भारतात जिओ स्वस्तात 5G सेवा देणार'

5G डेटा किंवा 5G रिचार्ज बाबत कंपनीने अजून कोणतीही घोषणा केली आहे. रिलायन्स जिओचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी बोलताना म्हटले की, 'भारतात थोड्या उशिरा याची सुरुवात झालीये. पण आम्ही जगाच्या तुलनेत चांगली गुणवत्ता आणि कमी दरात 5 जी सेवा देणार आहोत.

मुकेश अंबानी पुढे म्हणाले की, 'मी डिसेंबर 2023 पर्यंत देशाच्या प्रत्येक शहरात, तालुक्यात 5G सेवा पोहोचवण्यासाठी Jio प्रतिबद्ध आहे. Jio ची 5G टेक्नोलॉजी भारतात विकसित केली गेली आहे. त्यामुळे आत्मनिर्भर भारताबाबत ही यावर शिक्का लागला आहे.

किती रुपायांना प्लान?

मात्र, रिचार्जसाठी तुम्हाला किती पैसे खर्च करावे लागतील हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पण टेलिकॉम कंपन्या 5G प्लॅनच्या किंमतीबद्दल सतत सांगत आहेत की ते 4G प्रमाणेच असतील. हे निश्चित आहे की 5G रिचार्जसाठी 4G पेक्षा जास्त खर्च येईल, परंतु आपला खर्च जगातील इतर देशांच्या तुलनेत कमी असू शकतो.