नवी दिल्ली : भारत-चीन सीमेवर आता केवळ जवानच नव्हे तर, ड्रोनच्या माध्यमातून नजर ठेवली जाणार आहे. तेही थोड्याथोडक्या नव्हे तर, तब्बल 600 ड्रोनच्या मदतीने. हे ड्रोन सुमारे 5 हजार मीटर उंचीवरून सीमा परिसरातील 10 किलोमीटरच्या परिसरावर बारीक नजर ठेऊन असतील.
हे ड्रोन खरेदी करण्यासाठी भारताला 950 कोटी रूपये खर्च करावे लागतील. तसेच, हे ड्रोन सर्व सीमेवरील इन्फंट्री वटालीन्सना देण्यात येणार आहेत. एका वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार सीमवेवर वाढत्या घुसघोरीला आळा घालण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. महत्त्वाचे असे की, गेल्या एक वर्षभरात भारतीय लष्कराने तब्बल 175 पेक्षाही अधीक दहशतवाद्यांना मारले आहे.
हे ड्रोन कमीत कमी 4 ते 5 हजार मीटर उंचीवर उडू शकतात. तसेच 10 किलोमीटर परिसरातील हालचाल अचूक टीपण्याची क्षमता या ड्रोनमध्ये आहे. हे ड्रोन सातत्याने छायाचित्रे काढतील आणि बटालीयन कमांडरला पाठवतील. बॉर्डर पोस्ट सांभाळणाऱ्या इन्फंट्री बटालीयनला यांच्यासह अॅन्टी टेररीझम ऑपरेशन राबविणाऱ्या राष्ट्रीय रायफल्सलाही हे ड्रोन देण्यात येतील.
दरम्यान, लष्काराच्या सूत्रांच्या हवाल्याने प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, अनेक कंपन्यांकडून या ड्रोनची चाचणी घेण्यात येईल. त्यानंतर त्यांची व्हॅल्यूएशन टेस्ट केले जाईल. सर्व निकष पूर्ण होत असतील तरच या ड्रोन्सची खरेदी केली जाणार आहे. महत्त्वाचे असे की, हा व्यवहार करताना भारतीय कंपन्यांना प्राधान्या दिले जाईल, असेही प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे