70 Year Old Man Came Alive: वडिलांचे निधन झाले मुलाने अंत्यसंस्काराची तयारी केली. चिता रचली पण त्याचवेळी एक चमत्कार घडला आणि एकच गोंधळ उडाला. बिहारमधील (Bihar) शेखपुरामध्ये एक खळबळजनक घटना घडली आहे. यामुळं कुटुंबासह गावकरीही बुचकळ्यात पडले आहेत. (man came alive while family prepare his last rites)
शेखापुरा गावात राहणाऱ्या एका वृद्ध व्यक्तीचे निधन झाले. नातेवाईकांचा गोतावळा जमला, अत्यसंस्काराची तयारी करण्यात आली. स्माशानात चिता रचली मुलगा अग्नी देणार तितक्यात चितेवरील वृद्ध अचानक उठून उभा राहिला. हा सगळा प्रकार पाहून गावकरी गोंधळून गेले. तर, काही जणांनी घाबरुन तिथून धूम ठोकली. काही जण हा इश्वराचा चमत्कार असल्याचे म्हणत आहेत.
शेखपुरा जिल्ह्यातील ७० वर्षीय हिरा महतो यांचे श्वास थांबले. आवाज देऊनही हीरा यांनी प्रतिसाद दिला नाही. शेवटी नातेवाईकांचा त्यांचे निधन झाले असल्याचा समज झाला. गावातील व्यक्तीही घरच्यांची भेट घेण्यासाठी येऊ लागले. घरात त्यांच्या अत्यसंस्काराची तयारी करण्यात आली. इतर शहरात राहणाऱ्या नातेवाईकांनाही बोलवून घेण्यात आले.
लग्नाआधी राहावं लागतं लिव्ह-इनमध्ये, अन्यथा...; भारतातील या ठिकाणी आहे हा नियम
हिरा महतो यांना स्मशानात नेण्यात आले. इतर विधी झाल्यानंतर त्यांना सरणावर ठेवण्यात आले. मुलगा चितेला अग्नी देणार इतक्यात हिरा सरणावरच उठून बसले. वडिलांच्या चितेला अग्नी देण्यासाठी आलेल्या मुलगादेखील घडलेला प्रसंग पाहून हैराण झाला. काही वेळ घटनास्थळी एकच शांतता पसरली. सुरुवातीला लोकांना काय घडतंय हेच कळत नव्हतं. पण हिरा महतो यांना ठणठणीत पाहून त्यांनीही सुटकेचा निश्वास टाकला.
घडलेल्या प्रकारानंतर हिरा महतो यांना घरी आणण्यात आले. तसंच, डॉक्टरांनाही बोलवण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना तपासून निरोगी असल्याचे जाहीर केल्यानंतर सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. मात्र, कुटुंबीयांनी सुरुवातीला डॉक्टरांना घडलेला प्रकार सांगण्यास टाळाटाळ केली. इतकंच नव्हे तर, मीडियानेही यासंबंधी प्रश्न विचारला असता कुटुंबीयांनी सांगण्यास टाळाटाळ केली.
घराचं बांधकाम सुरु असताना सापडला मुघलकालीन खजिना, पण मालकाचा आनंद क्षणभरच टिकला कारण...
दरम्यान, या सगळ्या प्रकरणामुळं गावात एकच चर्चा रंगली आहे. प्रसारमाध्यमांनी या घटनेबाबत गावकऱ्यांना विचारल्यानंतर त्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. मात्र, त्यांनीही सविस्तर घटना सांगणे टाळले.
ल्युडो खेळता खेळता सासु जावयाच्या प्रेमात, रात्री भेटायला बोलवलं पण घडला भलताच ड्रामा