Har Ghar Tiranga : तिरंगा फडकावण्याबरोबरच Registration आवश्यक, Online भरा असा फॉर्म

75th Independence Day : ​भारत सरकारने हर घर तिरंगा (Har Ghar Tiranga) मोहीम सुरु केली आहे. ही मोहीम 13 ऑगस्टपासून म्हणजेच आजपासून सुरु झाली आहे. हर घर तिरंगा अभियानात सहभागी होण्यापूर्वी ऑनलाइन नोंदणी करणे देखील तुमच्यासाठी खूप महत्वाचे आहे. 

Updated: Aug 13, 2022, 03:21 PM IST
Har Ghar Tiranga : तिरंगा फडकावण्याबरोबरच Registration आवश्यक, Online भरा असा फॉर्म   title=

मुंबई : 75th Independence Day : भारत सरकारने हर घर तिरंगा (Har Ghar Tiranga) मोहीम सुरु केली आहे. ही मोहीम 13 ऑगस्टपासून म्हणजेच आजपासून सुरु झाली आहे. हर घर तिरंगा अभियानात सहभागी होण्यापूर्वी ऑनलाइन नोंदणी करणे देखील तुमच्यासाठी खूप महत्वाचे आहे. केवळ घरोघरी तिरंगा फडकवून तुम्ही या मोहिमेत सहभागी होणार नाही. यासाठी प्रथम नोंदणी (Registration) करणे देखील आपल्यासाठी खूप महत्वाचे आहे.

घर किंवा कार्यालयाच्या छतावर तिरंगा फडकावण्यापूर्वी तुम्हाला हर घर तिरंगा (Har Ghar Tiranga) या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल. येथे तुम्हाला अनेक पर्याय दिसतील. तुम्हाला मुख्यपृष्ठावरच (Home Page ) अनेक पर्याय दिसतील, परंतु येथे तुम्हाला PIN A Flag वर क्लिक करावे लागेल. या पर्यायावर क्लिक केल्यावर तुमच्यासमोर एक नवीन विंडो उघडेल. येथे तुम्हाला तुमचे नाव आणि मोबाईल नंबर टाकावा लागेल.

तुम्ही GMAIL खात्यावरही नोंदणी करु शकता

जर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर द्यायचा नसेल, तर तुम्ही Google खाते देखील वापरु शकता. येथून तुम्हाला Location Access द्यावा लागेल. लोकेशन अ‍ॅक्सेस दिल्यानंतर, तुम्हाला तुमच्या स्थानातील PIN A Flag In Your Location क्लिक करावे लागेल. यासह, तुम्ही येथे असलेल्या स्थानावर व्हर्च्युअल ध्वज देखील लावू शकता. नोंदणी केल्यानंतर तुम्ही सेल्फीही अपलोड Upload Selfie करू शकता.

सेल्फी कसा अपलोड करायचा?

सेल्फी अपलोड करण्यासाठी तुम्हाला विशेष काही करण्याची गरज नाही. तुम्हाला हर घर तिरंगा वेबसाइटवर अपलोड सेल्फीचा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक केल्यावर तुमच्या सिस्टीमचे किंवा मोबाईलचे स्टोरेज ओपन होईल. येथून आपण चित्र पाहू शकता. तसेच, तुम्हाला अपलोड करायचे असलेले कोणतेही चित्र तुम्ही सहजपणे अपलोड करु शकता. या वेबसाईटवर बेस्ट सेल्फीलाही स्थान दिले जात आहे.