7th Pay Commission DA Hike: दीड वर्षापासून अडकलेला महागाईभत्ता हाती लागणार... या महिन्यात

18 महिन्यांपासून रखडलेला महागाई भत्ता मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. आता कर्मचार्‍यांना यासाठी जास्त काळ थांबण्याची गरज भासणार नाही.

Updated: Jun 13, 2021, 03:33 PM IST
7th Pay Commission DA Hike: दीड वर्षापासून अडकलेला महागाईभत्ता हाती लागणार... या महिन्यात

मुंबई : केंद्रीय कर्मचार्‍यांसाठी आनंदाची बातमी आहे. 18 महिन्यांपासून रखडलेला महागाई भत्ता मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. आता कर्मचार्‍यांना यासाठी जास्त काळ थांबण्याची गरज भासणार नाही. कारण या महिन्यात त्यांच्यासाठी चांगली बातमी येऊ शकते. वास्तविक, केंद्रीय कर्मचार्‍यांची संस्था नेशनल काउंसिल ऑफ जॉइंट कंसल्टेटिव मशीनरी (JCM)यांची  26 जून रोजी बैठक होणार आहे आणि यामध्ये चांगला निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या बैठकीत, महागाई भत्त्यावर अंतिम शिक्का देण्यात येईल. यानंतर जुलैच्या पगारामध्ये महागाई भत्ता जोडून कर्मचाऱ्यांचे पगार देण्यात येईल.

जुलैमध्ये पगार वाढेल

केंद्र सरकारच्या कर्मचार्‍यांच्या महागाई भत्त्याची देय रक्कम मागील वर्षी जानेवारी 2020 पासून बंद करण्यात आली आहे. म्हणजे कर्मचाऱ्यांचे एकूण तीन हप्ते यायचे आहेत. या तीन हप्त्यांचे पैसे एकाच वेळी देण्यात येणार आहेत.

याचा अर्थ असा की, जुलैमध्ये केंद्रीय कर्मचार्‍यांच्या पगाराची मोठी रक्कम येईल आणि त्याचबरोबर मागील 18 महिन्यांपासून थांबलेला डीए देखील देण्यात येईल. यानंतर कर्मचार्‍यांचा महागाई भत्ता 28 टक्के होईल, जो सध्या 17 टक्के आहे.

7th व्या वेतन आयोगाच्या अंतर्गत केंद्रीय कर्मचार्‍यांचे किमान वेतन 18 हजार रुपये आहे. यात 15 टक्के महागाई भत्ता जोडणे अपेक्षित आहे. म्हणजेच या कर्मचाऱ्यांना दरमहा 27 हजार रुपये पगार मिळेल.  म्हणजेच वर्षाचा विचार केला तर, केंद्रीय कर्मचार्‍यांना डीएमध्ये 32 हजार 400 रुपयांचा एकूण लाभ मिळेल.

सरकारी सूत्रांच्या म्हणण्यानुसार, जून 2021 मधील महागाई भत्ताला थोड्या उशीर होईल. पण, त्यात 4 टक्क्यांनी वाढ होण्याची अपेक्षा आहे. म्हणजे ते ऑक्टोबरपर्यंत दिले जाऊ शकते. त्यावेळी महागाई भत्ता 32 टक्के असेल.

त्याचबरोबर गेल्या 18 महिन्यांपासूनच्या डीएची थकबाकी देय देण्याचीही मागणी कर्मचारी संघटनेने केली आहे. JCM चे नॅशनल कॉन्सिल शिवगोपाल मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार लेव्हल -१ मधील कर्मचार्‍यांचे डीए थकबाकी 11 हजार 800 पासून ते 37 हजार 554  रुपये आहे.

तर लेव्हल -13 किंवा लेव्हल-14 च्या कर्मचाऱ्यांच्या डीएची गणना केली, तर कर्मचार्‍यांच्या हाती 1 लाख 44 हजार 200 रुपये ते 2 लाख 18 हजार 200 रुपये पर्यंत येऊ शकतात.