भारतात ५ वर्षात सुमारे ९४ लाख ९८ हजार झाडांची कत्तल

महाराष्ट्रात तब्बल १३ लाख ४२ हजार झाडांची कत्तल 

Updated: Dec 13, 2019, 11:59 AM IST
भारतात ५ वर्षात सुमारे ९४ लाख ९८ हजार झाडांची कत्तल  title=

नवी दिल्ली : भारतामध्ये पाच वर्षात सुमारे ९४ लाख ९८ हजार झाडांची कत्तल करण्यात आल्याचं समोर आलं आहे. यात २०१५ ते २०१९ या कालावधीत महाराष्ट्रात तब्बल १३ लाख ४२ हजार झाडांची कत्तल झाल्याचं वनखात्याच्या एका अहवालात स्पष्ट झालं आहे. देशभरात विविध विकासकामांमध्ये ही झाडं अडथळा ठरत असल्याचं सांगण्यात आलं. याचबाबत महाराष्ट्रात आरेचाही विषय मोठ्या प्रमाणात चर्चिला गेला होता. 

झाडांच्या कत्तलीमध्ये मध्य प्रदेश, ओडिशानंतर महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक लागतो. तर नव्याने झाडांचं वृक्षारोपण करण्यातही महाराष्ट्र अग्रेसर असल्याचं या अहवालात म्हटलं आहे. झाडांच्या नव्याने वृक्षारोपणात तेलंगणापाठोपाठ महाराष्ट्र अग्रेसर असल्याचं यात सांगण्यात आलं आहे. पुनर्वृक्षारोपणात महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर असल्याचं या अहवालात म्हटलं आहे.

जुलै २०१९ पर्यंतची आकडेवारी

दिल्ली मेरठ एक्सप्रेस-वे - २२,०२७
पूर्वांचल एक्सप्रेस-वे - ३६,५७४
दिल्ली-वडोदरा-मुंबई एक्सप्रेस-वे - ३०,७८६
नॉर्दन पेरिफेरल एक्सप्रेस-वे १३,९६०
चेन्नई पोर्ट - ४,७९७
मुंबई-नागपूर सुपर कम्यु. एक्सप्रेस-वे - २,५०,०००
उत्तर भारत हायवे विस्तार - ३,५००