VIDEO : #Couple_Goals देणाऱ्या 'या' काका-काकूंचा डान्स व्हायरल

....म्हणून ही जोडी चर्चेत आली आहे. 

Updated: Dec 31, 2019, 10:07 AM IST
VIDEO : #Couple_Goals देणाऱ्या 'या' काका-काकूंचा डान्स व्हायरल

मुंबई :  एखाद्या गोष्टीप्रती असणारी आवड किंवा मग त्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन याच्या आड कधी वयाचा आकडा येता कामा नये, हा सिद्धांत अनेकजण पाळतात. अशाच सिद्धांताचं पालन करणारी एक जोडी, सध्या सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. व्हायरल होणाऱ्या सर्वच गोष्टी नेहमीच चर्चेचा विषय ठरतात. ही जोडीसुद्धा अशाच एका व्हायरल व्हिडिओमुळे चर्चेत आली आहे. 

अमुक एका प्रकारचं नृत्य करण्यासाठी ठराविक अशा पोषाखाचीच आणि वयोमानाचीच आवश्यकता असते हा समज या व्हिडिओमुळे मोडित निघत आहे. कारणही तसंच आहे. 

अनेक नेटकऱ्यांकडून शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओमध्ये एका समारंभादरम्यान पंजाबी  काका- काकू सुरेख असा कपल डान्स करताना दिसत आहेत. मुख्य म्हणजे यामध्ये अतिशय नजाकतीने नाचणाऱ्या काकूंनी साडी नेसलेली असूनही तितक्याच सराईतपणे त्या आपलं कौशल्य सादर करत आहेत. तर काकांचं नृत्यावर असणारं प्रभुत्वंही व्हिडिओ पाहताच क्षणी लक्षात येत आहे. 

व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमधील काका, काकू आहेत तरी कोण, असाच प्रश्न अनेकांकडून उपस्थित केला जात असताना एका युजरच्या कमेंटमुळे त्याविषयीची माहिती मिळाली आहे. गिताना सिंग या युजरचे हे आई-वडील असून, तिनेच काही दिवसांपूर्वी तो सोशल मीडियावर शेअर केला होता. 

'कोण म्हणतं साडीत नीट नाचता येत नाही....?', असं म्हणत गिताताने तिच्या आई-बाबांचा सुरेख असा हा व्हिडिओ शेअर केला होता. ज्यानंतर तो 'स्कूपव्हूप'च्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला. 

 
 
 
 

A post shared by ScoopWhoop (@scoopwhoop) on

गितानाच्या आई- वडिलांचा उत्साह हा तरुणाईला लाजवणारा असून, त्यांच्या नृत्यकौशल्याची प्रशंसा करावी तितकी कमीच आहे. मुख्य म्हणजे तिच्या अकाऊंटवर तिचा, वडिलांसोबत नृत्य करतानाचाही एक व्हि़डिओ पोस्ट करण्यात आला आहे. त्यामुळे हे सुंदर कुटुंब आणि त्यांची कला पाहता खरंच म्हणावं लागेल, क्या बात!