Optical Illusion: ऑप्टिकल इल्युजन म्हंटलं की नेटकऱ्यांच्या आवडीचा विषय. कारण या फोटोच्या माध्यमातून बुद्धीचा कस लागतो. तसेच काही फोटोतील दडलेल्या वस्तू शोधण्यासाठी काही सेकंदाचा अवधी असतो. त्यामुळे झटपट वस्तू शोधल्यानंतर एक वेगळाच आनंद मिळतो. असाच एक फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या फोटोत एक चेहरा लपला असून अवघ्या 30 सेकंदात शोधण्याचं आव्हान दिलं आहे. हा फोटो पाहा आणि चेहरा शोधण्याचा प्रयत्न सुरू करा. पण योग्य उत्तर शोधण्याआधी तुमच्या मोबाईलमध्ये टायमर सेट करायला अजिबात विसरू नका. कारण हे कोडं 30 सेकंदात सोडवण्यात फार कमी लोकांना यश आले आहे. फोटो बारकाईने पाहिल्यास योग्य उत्तर मिळू शकते.
ऑप्टिकल इल्युजन फोटोत कॉफीच्या बिया दिसत आहेत. त्यामुळे नेमका चेहरा कुठे आहे? असा प्रश्न प्रत्येकाला पडला आहे. अनेकांनी लपलेला चेहरा शोधण्याचा खूप प्रयत्न केला. पण काही लोकांनाच योग्य उत्तर मिळालं आहे. जर तुम्हाला या फोटोमध्ये लपलेला चेहरा दिसत नसेल, तर फोटोच्या खालच्या भागात शोधण्याचा प्रयत्न करा. तरीही तुम्हाला योग्य उत्तर मिळत नसेल तर हरकत नाही, आम्ही तुम्हाला योग्य उत्तर सांगतो.
हा फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. ऑप्टिकल इल्युजन फोटो इतका गुंतागुंतीचा आहे की बुद्धीचा कस लागतो. एवढेच नाही तर कोडं सोडवल्यानंतर वेगळाच आनंद मिळते. जर तुम्हीही हे कोडे सोडवले असेल, तर याचा अर्थ तुमची बुद्धी आणि डोळेही खूप तीक्ष्ण आहेत.