वयस्कर महिलांना विवस्त्र करून शेतात सोडणारा Serial Killer..., Porn पाहून करायचा बलात्कार अन् नंतर...

वयस्कर महिलांवर बलात्कार करुन त्यांची हत्या करणाऱ्या सीरियल किलरला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी महिलांची हत्या केल्यानंतर त्यांचे नग्न मृतदेह शेतात सोडून देत असे. चार महिलांचे मृतदेह सापडल्यानंतर एकच खळबळ माजली होती. पोलिसांनी अखेर या सीरियल किलरला अटक केली आहे  

Updated: Jan 27, 2023, 12:42 PM IST
वयस्कर महिलांना विवस्त्र करून शेतात सोडणारा Serial Killer..., Porn पाहून करायचा बलात्कार अन् नंतर...
सीरियल किलरचा जबाब ऐकून पोलीसही हादरले

Serial Killer Arrested: उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) अयोध्या पोलिसांनी बलात्कार आणि हत्येप्रकरणी (Rape and Murder) एका 20 वर्षांच्या तरुणाला अटक केली आहे. पोलिसांना गेल्या 50 दिवसात चार वयस्कर महिलांचे (Elderly Woman Dead Bodies) मृतदेह आढळले होते. या महिलांवर बलात्कार करुन त्यांची हत्या करण्यात आली होती. बाराबंकी (Barabanki) जिल्ह्यात ही धक्कादायक घटना घडली होती. दरम्यान पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तरुण पीडित महिलांना ओळखत नव्हता. त्याने कोणतंही कारण नसताना या महिलांची हत्या केल्याचं उघड झालं आहे. आरोपी सध्या पोलिसांच्या अटकेत आहे. चौकशीत त्याने काही धक्कादायक खुलासे केले आहेत. 

अयोध्याचे अतिरिक्त सहाय्यक पोलीस आयुक्त कुमार सोनकर याांनी दिलेल्या माहितीनुसार, अमरेंद्र याने बाराबंकी येथील तीन आणि अयोध्येतील एका महिलेची हत्या केली. त्यानेही चारही हत्या करण्यासाठी एकच पद्धत अवलंबली. आधी त्याने महिलांवर बलात्कार केला आणि नंतर त्यांची हत्या केली. 

महिलांचे मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांनी संशयित आरोपीचं चित्र प्रसिद्ध केलं होतं. बाराबंकी पोलिसांची सहा पथकं आरोपीचा शोध घेत होती. पोलिसांनी लोकांनाही आरोपीला पकडण्यासाठी मदत करण्याचं आवाहन केलं होतं. 

वयस्कर महिलांवर बलात्कार करुन हत्या

5 डिसेंबर 2022 ला 60 वर्षीय महिला सकाळी घराबाहेर पडली होती. संध्याकाळपर्यंत महिला घरी परतली नसल्याने कुटुंबाने पोलिसांत बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. दुसऱ्या दिवशी पोलिसांना शेतात तिचा मृतदेह नग्न अवस्थेत आढळला. महिलेचा चेहरा आणि डोक्यावर जखमांच्या खुणा होत्या. शवविच्छेदनात महिलेवर बलात्कार झाल्याचं आणि नंतर गळा दाबून हत्या झाल्याचं उघड झालं. 

17 डिसेंबरला पोलिसांना एका 62 वर्षीय महिलेचा मृतदेह त्याच अवस्थेत आढळला. 29 डिसेंबरला एक महिला बेपत्ता झाली असता दुसऱ्या दिवशी शेतात नग्न अवस्थेत तिचा मृतदेह आढळला होता. 55 वर्षीय या महिलेच्या हत्येची पद्धतही सारखीच होती. या महिलेवरही बलात्कार करण्यात आला होता. 

या सर्व हत्या एका व्यक्तीने केल्या असल्याच्या निष्कर्षावर पोलीस पोहोचले. सायको किलर वयस्कर आणि मध्यमवयीन महिलांना टार्गेट करत असल्याने पोलिसांसमोर आरोपीला लवकरात लवकर अटक करण्याचं आवाहन होतं. यानंतर पोलिसांनी आरोपीला पकडण्यासाठी सहा पथकं स्थापन केली. 

"आम्हाला मंगळवारी एका व्यक्तीने महिलेवर हल्ला करत बलात्काराचा प्रयत्न करत असल्याची माहिती मिळाली. स्थानिकांनी त्याला पकडून ठेवलं होतं. आम्ही नंतर त्याला ताब्यात घेतलं," अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. चौकशी केली असता त्याने आपण बाराबंकी आणि अयोध्येत महिलांवर बलात्कार करुन हत्या केल्याचं कबूल केलं. जेव्हा कधी आपल्याला वयस्कर किंवा मध्यमवयीन महिला निर्जनस्थळी दिसत असत तेव्हा आपण गुन्हा करत होतो अशी कबुली त्याने दिली आहे.