भोपाळ : मध्य प्रदेशात (Madhya Pradesh News) केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या कार्यक्रमाहून माघारी परतणाऱ्या बसचा भीषण अपघात झाला आहे. (Madhya Pradesh Bus Accident ) या अपघातामध्ये 13 जणांचा मृत्यू झालाय तर 39 जणं जखमी झालेत. एका भरधाव ट्रकने तीन बसला टक्कर दिल्याने ही दुर्घटना घडली. मध्य प्रदेशातील सिद्धी -रिवा दरम्यान हा अपघात झाला. दुर्घटनेतील जखमींवर रेवा आणि सिद्धी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी घटनास्थळी भेट दिली. तसेच मृतांच्या नातेवाईकांना 10 लाखांची मदत जाहीर केली आहे. अमित शाह यांनीही या दुर्घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले आहे.
ट्रकच्या धडकेनंतर दोन बस एकमेकांवर धडकल्यानंतर सुमारे 10 फूट खोल खड्ड्यात पडल्या. यात एका बसचा चक्काचूर झाला. या अपघातात एका कारलाही धडक बसली. या भीषण अपघातानंतर घटनास्थळी हळहळ व्यक्त करण्यात आली. अपघातानंतरचे दृश्य हृदय पिळवटून टाकणारे होते. मृतांमध्ये कोणाचे डोके चिरडले गेले तर कोणाचे हात पाय कापले गेले. जखमींना सिधीचे जिल्हा रुग्णालय, चुरहटचे सार्वजनिक आरोग्य केंद्र आणि रिवाच्या संजय गांधी वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातात आठ जणांचा जागीच तर चार जणांचा हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला.
MP| Rs 10 lakh ex-gratia amount to be given to families of those who have died in road accident in Sidhi district while Rs 2 lakh to be given to severely injured & Rs 1 lakh to moderately injured. Govt jobs to be given to next of kin of dead as per qualification: CM SS Chouhan
— ANI MP/CG/Rajasthan (@ANI_MP_CG_RJ) February 24, 2023
चुरहट पोलीस स्टेशन हद्दीतील मोहनिया बोगद्याजवळ शुक्रवारी हा अपघात झाला. रात्री 9.00 वाजण्याच्या सुमारास एका भरधाव वेगात असणाऱ्या ट्रकने तीन बसला धडक दिली. या बसेस सतना येथे आयोजित कार्यक्रमाला जात होत्या. या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला, तर 39 हून अधिक जण जखमी झाले. कार्यक्रम आटोपल्यानंतर सर्व बस सतना येथून थेट रामपूर बघेलान आणि रिवा मार्गे मोहनिया बोगद्याकडे जात होत्या. बोगद्यापासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या सिधी जिल्ह्यातील चुरहट पोलीस स्टेशन हद्दीतील बरखडा गावाजवळ तीन बस काही काळ थांबल्या होत्या.
आज रात सीधी जिले में हुई दुर्घटना में खड़ी बसों से ट्रक द्वारा टकराने के फलस्वरूप हुई जन हानि और रेस्क्यू प्रयासों की घटनास्थल पर पहुंचकर जानकारी प्राप्त की। प्रशासनिक अधिकारियों, नागरिकों और घटना के प्रत्यक्षदर्शियों से विस्तृत विवरण जाना। दु:ख की इस घड़ी में हम सब साथ हैं। pic.twitter.com/t4DSbbM4el
— Shivraj Singh Chouhan (@ChouhanShivraj) February 24, 2023
लोकांना अन्नाची पाकिटे वाटली जात असतानाच हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. अपघातातील बळी पडखुरी येथील रहिवासी अशोक कोळ यांनी सांगितले की, मोहनिया बोगद्याच्या बाहेर बरखडा गावाजवळ तीन बस उभ्या होत्या आणि लोकांना अन्नाची पाकिटे वाटली जात होती. एका बसमध्ये 60 ते 61 जण होते. दरम्यान, पाठीमागून सिमेंटने भरलेला ट्रकने जोरदार धडक दिल्याने बस खड्यात कोसळल्यात.
या बस अपघाताची माहिती मिळताच मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान हे रीवा येथे पोहोचले. त्यांनी संजय गांधी रुग्णालयात जखमींची विचारपूस केली. यावेळी त्यांनी मृतांच्या नातेवाईकांना दहा लाखांची मदत, सदस्यांना नोकऱ्या देण्याचा आश्वासन दिले आहे. ते म्हणाले की, संपूर्ण सरकार पीडित कुटुंबाच्या दुःखाच्या वेळी त्यांच्या पाठीशी उभे आहे.