झी एन्टरटेन्मेंट एंटरप्रायझेस लिमिटेडने पद्मविभूषण श्री रतन टाटा जी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. श्री. रतन टाटा जी हे एक असे नाव आहे जे भारतीयांच्या अनेक पिढ्यांसाठी नेतृत्व, दूरदृष्टी, करुणा आणि कार्य नैतिकतेचे दीपस्तंभ आहे. ज्यांनी कोट्यवधी भारतीयांच्या उन्नतीसाठी, भारताच्या अर्थव्यवस्थेत महत्त्वपूर्ण योगदान दिलेल्या अशा कॉर्पोरेट जगताच्या नेत्याला विनम्र श्रद्धांजली म्हणून, ZEE Entertainment Enterprises Ltd. चे MD आणि CEO – श्री. पुनित गोयंका यांनी 'चरित्रात्मक चित्रपटाचा' प्रस्थाव ठेवला आहे. श्री रतन टाटा यांनी केलेले महान कार्य राष्ट्र आणि जगासमोर विशेषतः तरुणांपुढे मांडले पाहिजे. या दिशेने ZEE पाऊल टाकत आहे.
ZEEL चे अध्यक्ष श्री. आर. गोपालन म्हणाले की, भारत श्री टाटा यांची उणीव भासणार असल्याने सगळेच दु:खी आहे. या प्रकल्पाला मंजुरी देताना ते म्हणाले की, "श्री रतन टाटा यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी ZEE स्टुडिओजद्वारे चित्रपटाची निर्मिती केली जाईल. आम्हाला असे वाटते की, हा चित्रपट जगावर सकारात्मक प्रभाव टाकेल, त्यांच्या जीवनातून अनेक गोष्टी शिकवेल आणि लाखो लोकांना त्यांच्या पावलावर पाऊल ठेवण्यास प्रेरित करेल."
हा प्रकल्प करण्यासाठी ZEE ला TATA सन्सकडून मंजूरी मिळवल्यानंतरच हा प्रकल्प होईल. या चित्रपटातून ZEE स्टुडिओने कमावलेला नफा सामाजिक कारणांसाठी आणि गरजूंना मदत करण्यासाठी दान केला जाईल. चित्रपटाला जागतिक स्तरावर पोहोचण्यासाठी, ZEE स्टुडिओ सह-निर्माता म्हणून WION (वर्ल्ड इज वन न्यूज) सह सहयोग करेल, जेणेकरून चित्रपट जागतिक स्तरावर पोहोचू शकेल आणि याला 190 हून अधिक देशातून मोठ्याप्रमाणात दर्शकांची संख्या लाभेल. श्री. रतन टाटा जी एक जागतिक व्यक्तिमत्व होते आणि जागतिक स्तरावर त्यांच्या कृतींचा आदर केला जातो.
ZEE मीडियाचे सीईओ श्री करण अभिषेक सिंग, म्हणाले, "ZEE न्यूज समुहाला ZEEL च्या या इच्छित उपक्रमाशी जोडले जाण्याचा बहुमान वाटतो, आम्ही दिवंगत व्यक्तीमत्त्वासाठी मनापासून शोक व्यक्त करतो."
ZEE स्टुडिओचे चीफ बिझनेस ऑफिसर श्री उमेश बन्सल म्हणाले की, " राष्ट्राचा स्वतःचा ब्रँड म्हणून, ZEE स्टुडिओजच्या संपूर्ण टीमला श्री रतन टाटा यांच्या जीवनावरील माहितीपट/चरित्रात्मक चित्रपटावर काम केल्याबद्दल अत्यंत सन्मान आणि अभिमान वाटतो. असे महान व्यक्तिमत्व आणि त्यांचा वारसा साजरा करणे हे आपले कर्तव्य आहे असे आम्ही मानतो. आम्ही भारताला आश्वासन देतो की ZEE स्टुडिओ त्यांचे खरे योगदान दाखवण्यासाठी तसेच त्यांचे जीवन योग्य पद्धतीने चित्रित करण्यात कोणतीही कसर सोडणार नाही.”