Viral Video: आपल्या एरियातला 'अजय देवगण' दोन म्हशींवर स्वार झाला श्वान

कुत्तों का अजय देवगण असं कॅप्शन देत हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओ तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत कुत्रा दोन म्हशींवर स्वार झाला आहे.  

Updated: Jul 28, 2023, 05:18 PM IST
Viral Video: आपल्या एरियातला 'अजय देवगण' दोन म्हशींवर स्वार झाला श्वान  title=

Dog Stunt Video: सोशल मिडियावर अनेक गंमतीशीर व्हिडिओ व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडिओ सोशल मिडियावर झाला आहे. एका कुत्र्याचा हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओत एक कुत्रा दोन म्हशींवर स्वार झाला आहे. दोन म्हशींवर स्वार झालेल्या या कुत्र्याला पाहून अनेक जण कुत्तों का अजय देवगण अशी प्रतिक्रिया देत आहेत. या व्हिडिओवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षावर होत आहे. अनेकांना हा व्हिडिओ पाहून हसू अनावर होत आहे. 

 'फूल और कांटे' चित्रपट आठवला

दोन म्हशींवर उभ राहून स्टंट करणाऱ्या या कुत्र्याला पाहून अभिनेता अजय देवगण याच्या 'फूल और कांटे' चित्रपटाची आठवण झाली. 1991 मध्ये रिलीज झालेल्या या चित्रपटाच्या माध्यमातून अजय देवगण याने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट पुरुष पदार्पणाचा फिल्मफेअर पुरस्कार देखील अजय देवगण याला मिळाला होता. अजय देवगण याने दोन बाईकवर उभं राहून एकदम खतरनाक असा स्टंट या चित्रपटात केला आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये कुत्रा दोन म्हशींवर स्वार झाला आहे. यामुळे कुत्र्याचा व्हिडिओ पाहून  'फूल और कांटे' चित्रपटाची आठवण झाल्याची कमेंट अनेकांनी केली आहे. 

काय आहे व्हायरल व्हिडिओ मध्ये?

@HasnaZarooriHai नावाच्या ट्विटर हँडलवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. कुत्तों का अजय देवग असं कॅप्शन देत हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला 52.4K Views आले आहेत. हजारो लोकांनी या व्हिडिओला लाईक केले आहे. तर, या व्हिडिओवर  गंमतीशीर कमेंट्सचा वर्षाव होत आहे. या व्हिडओमध्ये एक कुत्रा दोन म्हशींवर स्वार झाला आहे. दो म्हशींच्या पाठीवर त्याने पाय ठेवले आहेत. या म्हशी चालत आहेत. मात्र, म्हशी चालत असल्या तरी अजिबात डगमगताना दिसत नाही. या कुत्र्याच्या गळ्यात पट्टा नाही. यामुळे हा भटका कुत्रा असावा अंदाज व्यक्त केला जात आहे. हा व्हिडिओ नेमक्या कोणत्या ठिकाणचा आहे हे समजू शकलेले नाही. 

कडी उघडून पिंजऱ्यातून कुत्रे पळाले

एरव्ही कैदेत ठेवलेली माणसं पळून जातात असं आपण नेहमीच पाहिले. मात्र, कोंडवाड्यात पिंजऱ्यात ठेवलेली कुत्रेही त्यांची अक्कल वापरून कसे पळून जातात. संभाजीनगर मध्ये काही भटके कुत्रे एका पिंजऱ्यात कैद करण्यात आली होती. यातील एका कुत्र्याने पिंजऱ्याचा कडीकोंडा उघडला त्यानंतर तो आणि त्याच्यासोबत काही कुत्रे पळून गेले. कुत्र्यांचा हा व्हिडिओ तुफना व्हायरल झाला आहे.