वा... काय कॉन्फिडन्स आहे मुलीचा! असे पाढे शिकवले की विद्यार्थी आयुष्यभर विसरणार नाहीत

बऱ्याचदा विद्यार्थी शाळांमध्ये होम वर्क न केल्याने तसेच मस्ती केल्यामुळे शिक्षकांचा ओरडा खाताना दिसतात. अशा प्रकारचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. मात्र, शाळेत विद्यार्थ्यांना शिकवणाऱ्या या मुलीच्या व्हिडिओने सगळ्यांचीच मनं जिंकली आहेत. 

Updated: Dec 7, 2022, 11:56 PM IST
वा... काय कॉन्फिडन्स आहे मुलीचा! असे पाढे शिकवले की विद्यार्थी आयुष्यभर विसरणार नाहीत

Viral Video: सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असताता. अशाच एक व्हिडिओ सध्या इंटनेटवर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडि एका शाळेतील आहे. मात्र, येथे वर्गावर शिक्षक किंवा सर नाही तर एक लहान मुलगी विद्यार्थ्यांना शिकवताना दिसत आहे. या छोट्या मास्तरीनबाईंनी नेटकऱ्यांची मनं जिंकली आहेत.   हा व्हिडिओ कोणत्या शाळेतील आहे. ही विद्यार्थीनी कोणत्या इयत्तेच्या मुलांना शिकवत आहे. याचा तपशील अद्याप समोर आलेला नाही.  @Gulzar_sahab नावाच्या ट्विटर अकाउंटवरु हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. 

या व्हिडिओत एक लहान मुलगी शाळेच्या गणवेशात दिसत आहे. ती एका वर्गात उभी राहून विद्यार्थ्यांना पाढे शिकवत आहे. तिचा शिकवण्याचा उत्साहस अत्यंत कौतुकास्पद असा आहे. विशेष म्हणजे या मुलीचे मागे वर्गातील विद्यार्थी देखील तितक्याच उत्साहात पाढे म्हणत आहेत.

विशेष म्हणजे ही मुलगी न घाबरता, मध्ये न अडळता एखाद्या विद्वान शिक्षकाप्रमाणे मुलांना पाढे शिकवत आहेत. ही मुलगी शिक्षकाच्या भूमीकेत अत्यंत क्यूट दिसत आहे. तिचा हा व्हिडिओ हजारो लोकांनी पाहिला आहे. अनेक जण हा व्हिडिओ रिट्विट करत आहेत. तर, यावर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. 