'मॅडम जरा मला...,' Zomato डिलिव्हरी बॉयने अचानक पँटची चेन उघडली अन्...; रात्री 1 वाजता तरुणीची पोस्ट

तरुणीने एक्सवर पोस्ट शेअर करत मंगळवारी रात्री उशिरा आपण कॉफीची ऑर्डर दिली असता नेमकं काय झालं याचा खुलासा केला आहे.   

शिवराज यादव | Updated: Aug 29, 2024, 03:40 PM IST
'मॅडम जरा मला...,' Zomato डिलिव्हरी बॉयने अचानक पँटची चेन उघडली अन्...; रात्री 1 वाजता तरुणीची पोस्ट title=

झोमॅटोच्या डिलिव्हरी एजंटकडून आपला लैंगिक छळ झाल्याचा आरोप एका तरुणीने केला आहे. तरुणीने एक्सवर पोस्ट शेअर करत संपूर्ण घटनाक्रम सांगितला आहे. अहमदाबामध्ये मंगळवारी मुसळधार पाऊस पडत असताना आपण कॉफीची ऑर्डर दिली होती. यावेळी ही घटना घडली अशी माहिती तरुणीने दिली आहे. आपली डिलिव्हरी येण्यासाठी अपेक्षेपेक्षा जास्त वेळ गेला. मात्र मी परिस्थिती समजून घेतली असं तरुणीने सांगितलं. 

"डिलिव्हरी एंजट वारंवार उशीर झाल्याबद्दल माफी मागत होता. यावेळी तो सतत हसत होता, ज्यामुळे मला थोडं विचित्र वाटत होतं. पण मी याकडे दुर्लक्ष केलं. देशातील सध्याची स्थिती पाहता मी त्याला फारसं महत्व दिलं नाही," असं तिने लिहिलं आहे. पुढे तिने सांगितलं आहे की, यादरम्यान डिलिव्हरी एजंट सतत आपल्या पायाला झालेल्या जखमेचा उल्लेख करत होता. यावेळी तो पायाकडे हातही दाखवत होता.

तिने सांगितलं की, मी ड्रायव्हरच्या पायावर फ्लॅशलाइट लावला असताना त्याने गुप्तांग उघड केलं. "तो हसत होता आणि मला मॅम, जरा मदत करा असं सांगत होता," असा आरोप महिलेने केला आहे. 

आपण तात्काळ झोमॅटोला फोन करुन घटनेची माहिती दिली. मात्र त्यांनी दिलेलं उत्तर निराशा वाढवणारं होतं असं तिने सांगितलं आहे. "फोनवरील महिलेने आम्ही दोन्ही बाजू म्हणजेच माझी आणि डिलिव्हरी एजंटची बाजू ऐकू असं सांगितलं," अशी माहिती तरुणीने दिली आहे.

"रात्री 1 वाजता झोमॅटोच्या कस्टमर केअरला फोन करण्याचे कष्ट कोण घेईल? मी काय रिफंट किंवा इतर काही मागणी करत नव्हते. मला फक्त कारवाईची अपेक्षा होती. पण एक महिला असल्याने पुढील नोटीस येईपर्यंत वाट पाहा सांगणं घृणास्पद आणि अवैध आहे," असा संताप तिने व्यक्त केला आहे.

"मला अद्यापही यासंबंधी झोमॅटोकडून फोन आलेला नाही. यामुळे मला इमर्जन्सीत जेवण मागवणंही आता असुरक्षित वाटत आहे. डिलिव्हरी सुऱक्षित करण्याच्या तुमच्या नैतिकतेची लाज वाटली पाहिजे," असा संताप तिने मांडला आहे. या घटनेमुळे आपल्याला प्रचंड मानसिक त्रास झाल्याचं तिने सांगितलं आहे. तसंच अनेक महिलांना हा अनुभव येत असावा, पण ते बोलत नसतील असंही म्हटलं आहे. 

दरम्यान काही वेळाने तिने झोमॅटोने संपर्क साधत योग्य पावलं उचलली जातील असं आश्वासन दिल्याची माहिती दिली. पण तरीही आपल्याला असुरक्षित वाटत असल्याचं तिने सांगितलं आहे. तिने सांगितले की डिलिव्हरी एजंटला काढून टाकण्यात आलं असून त्याचा परवाना रद्द करण्यात आला आहे. "मी असे म्हणणार नाही की मला आता सुरक्षित वाटत आहे. मला अजूनही असुरक्षित वाटते, परंतु त्यांनी जे शक्य होते ते केले," असं ती म्हणाली.