Rahul Gandhi : 29 ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय क्रीडा दीन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्ताने काँग्रसचे खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात ते जिऊ जित्सु मार्शल आर्ट (Marshal Art) करताना दिसतायत. या व्हिडिओ सोबत राहुल गांधी यांनी एक कॅप्शन दिलं आहे, यात त्यांनी म्हटलंय 'भारत जोडो यात्रेदरम्यान दररोज जिऊ-जित्सु मार्शल आर्टचा सराव करत होतो, यात अनेक लोकांनी सहभाग घेतला' असं सांगत राहुल गांधी यांनी 'भारत डोजो यात्रा' ( Bharat Dojo Yatra) सुरु करणार असल्याची घोषणा केली.
काय लिहिलंय राहुल गांधी यांनी?
राहुल गांधी यांनी व्हिडिओ शेअर करत म्हटलंय 'भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान हजारो किलोमीटर चालायचो, यात कॅम्पसाईटला थांबल्यानंतर मार्शल आर्टचा सराव करायचा दैनंदिन कार्यक्रम होता. शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी आणि स्वत:च्या सुरक्षेसाठी मार्शल आर्ट गरजेचं आहे. आमच्यासोबत विविध शहरातील लोकं आणि विद्यार्थी जोडले जात होते' असं राहुल गांधी यांनी म्हटलंय.
राष्ट्रीय क्रीडा दिन
आमचं ध्येय तरुणांना या जेंटल आर्टशी ओळख करुन देण्याचं आहे. राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त, मला माझा अनुभव तुम्हा सर्वांसोबत शेअर करायचा आहे, तुमच्यापैकी काहींना या कलेचा' सराव करण्याची प्रेरणा मिळेल या आशेने हा व्हिडिओ शेअर केल आहे. यासोबत राहुल गंधी यांनी शेवटी शेवटी एका ओळीत लिहिलंय, 'इंडिया डोजो टूर लवकरच येत आहे'.
आय आहे डोजो?
राहुल गांधी घोषणा केलेला डोजो नक्की आहे तरी काय याची उत्सुकता लोकांना लागलीय. वास्तविक मार्शल आर्टच्या ट्रेनिंग हॉल किंवा शाळेला डोजो म्हटलं जातं. राहुल गांधी यांनी शेअर केलेल्या व्हिडिओत ते एका ट्रेनिंग हॉलमध्ये मुलांबरोबर मार्शल आर्ट करताना दिसत आहेत.
भारत जोडो यात्रा
राहुल गांधी यांनी 2022 मध्ये भारत जोडो यात्रेला सुरुवात केली होती. पहिल्या टप्प्यात त्यांनी 150 दिवस पदयात्रा केली. यात त्यांच्याबरोबर अनेक लोकं जोडली गेली. त्यांनी कन्याकुमारी ते काश्मिर आणि दुसऱ्या टप्प्यात मणिपूर ते गुजरात अशी यात्रा केली. लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा काँग्रेसला मोठा फायदा झाल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. लोकसभा निवडणूक (Loksabha) 2024 मध्ये काँग्रेसने 99 जागा जिंकल्या होत्या.