पत्नीला शिक्षा देण्यासाठी बाईकला बांधून फरफटलं; नंतर तिच्या अंगावर उभं राहून...; क्रूरतेची हद्द पार करणारा VIDEO

राजस्थानमध्ये (Rajasthan) पतीने पत्नीला दुचाकीला बांधून फरफटत नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडीओ पाहून तुमचीही तळपायाची आग मस्तकात जाईल.   

शिवराज यादव | Updated: Aug 13, 2024, 04:51 PM IST
पत्नीला शिक्षा देण्यासाठी बाईकला बांधून फरफटलं; नंतर तिच्या अंगावर उभं राहून...; क्रूरतेची हद्द पार करणारा VIDEO title=

राजस्थानमध्ये (Rajasthan) पतीने पत्नीला दुचाकीला बांधून फरफटत नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडीओत पती महिलेला जमिनीवर फरफटत असताना ती मदतीसाठी याचना करत असल्याचं दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. नागौर जिल्ह्यात ही घटना घडली आहे. 

पतीने क्रूरतेची हद्द गाठली आहे. याचं कारण तिला जमिनीवर फरफटल्यानंतर वेदनेने विव्हळत असताना पती दुचाकीवरुन उतरल्यानंतर तिच्या अंगावर उभा राहतो. यावेळी ती जखमी अवस्थेत खाली पडलेली असते. गेल्या काही सेकंदात जे काही होतं, त्यामुळे तिला मानसिक धक्काक बसलेला असतो. यादरम्यान ती सतत मदत मागत असते. 

संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद कऱण्यात आली असून 40 सेकंदाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यातून महिलांवर कितपत अत्याचार होतात हेदेखील समोर आलं आहे. विशेष म्हणजे यावेळी घटनास्थळी तीन लोक उपस्थित होते, ज्यामध्ये एक महिला होती. पण एकहीजण मदतीसाठी पुढे आला नाही. याउलट ते कॅमेऱ्यात घटना कैद करत होते. 

हा व्हिडीओ भारतीय महिलांना दररोज सामोरं जाव लागणाऱ्या हिंसाचाराला अधोरेखित करत आहे. कोलकात्याच्या आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमधील एका डॉक्टरचा बलात्कार आणि खून करण्यात आल्यानंतर आता ही घटना उघडकीस आली आहे. 

दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडीओमधील आरोपी पतीची ओळख अद्याप पटलेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, पत्नीला जैसलमेरमधील आपल्या बहिणीच्या घरी जायचं असल्याने पतीने तिला मारहाण केली. तथापि, हे वधूची 'खरेदी' केल्याचे प्रकरण देखील असू शकतं. दुसऱ्या राज्यातील पत्नी 'खरेदी' करण्याच्या भयंकर प्रथेचा संदर्भ येथे असू शकतो. झुंझुनू, नागौर आणि पाली सारख्या जिल्ह्यांमधे अशी प्रकरणं नोंदवली आहेत. 

अशा प्रकारे 'खरेदी केलेल्या' महिलांना त्यांच्या 'पती'कडून आणि अनेक बाबतीत गावातील इतर पुरुषांकडून शारीरिक, मानसिक आणि लैंगिक अत्याचाराचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागतो. त्यांना शेतात सक्तीच्या मजुरीच्या स्थितीत पाठवले जाते आणि घरकाम करण्यास भाग पाडले जाते आणि अंथरुणावर 'पती'ला संतुष्ट करण्यासाठी सेवा दिली जाते. पोलिसांनी या व्हिडीओची चौकशी केली जाईल असं सांगितलं आहे. 

एफआयआर दाखल करण्यात आला असून, ज्यांनी व्हिडीओ काढला मात्र हस्तक्षेप केला नाही त्याच्यावरही कारवाई केली जाईल. "आम्ही हे प्रकरण खूप गांभीर्याने घेतलं आहे. महिलेला बहिणीकडे जायचं असल्याने हल्ला झाला अशी प्राथमिक माहिती आहे. ती नागौरला येणार आहे, त्यानंतर आम्ही पुढील कारवाई करू," असं नागौरचे पोलीस अधीक्षक नारायण तोगस यांनी सांगितलं आहे.